अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A? 

By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 04:18 PM2022-05-13T16:18:43+5:302022-05-13T16:18:56+5:30

जागतिक बाजारात लाँच झालेला Google Pixel 6A स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांनंतर कंपनी भारतात आपला स्मार्टफोन सादर करणार आहे.  

Google Pixel 6A India Launch Timeline And Price In India   | अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A? 

अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A? 

googlenewsNext

अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम Google च्या मालकीची आहे. त्यामुळे प्योर अँड्रॉइडचा अनुभव Google Pixel स्मार्टफोनवर घेता येतो. परंतु भारतीयांच्या नशिबात हा अनुभव खूप कमी वेळा येतो. कंपनीनं गेल्या दोन वर्षांत Google Pixel स्मार्टफोन्स भारतात सादर केले नाहीत. जागतिक बाजारात पिक्सल स्मार्टफोन्स सादर होत आहेत परंतु भारतात त्यांची एंट्री होत नाही. परंतु आता Google Pixel 6A स्मार्टफोन लवकरच भारतात देखील लाँच केला जाईल.  

दोन दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आलेला कंपनीचा सर्वात स्वस् Google Pixel 6A स्मार्टफोन भारतात येणार असल्याची कबुली गुगल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील एका ट्विटमधून मिळाली आहे. ज्यात गुगलनं लिहलं आहे की, “आम्हाला ही घोषणा करताना आनंद होतोय की Pixel 6a यावर्षीच्या अखेरपर्यंत भारतात देखील लाँच केला जाईल.” 

दोन वर्षांपूर्वी आलेला Google Pixel 4a स्मार्टफोन भारतातील शेवटचा गूगल फोन होता. Google Pixel 4 आणि 4XL मध्ये Soli radar chip वापर करण्यात आला होता, ज्यात 60GHz spectrum चा वापर करण्यात आला होता. या चिपसेटचा भारतात व्यवसायिक वापर करता येत नाही, म्हणून हे फोन लाँच झाले नाहीत. त्यानंतर पिक्सल 5 सीरीजचे Pixel 5 आणि Pixel 5a देखील भारतात आले नाहीत. स्वस्त चिनी कंपन्यांना मिळणारी पसंती हे देखील महागडे पिक्सल फोन्स भारतात न येण्यामागचं एक कारण आहे. आता Google Pixel 6A च्या माध्यमातून गुगल भारतात जोरदार पुनरागमन करणार आहे.  

Google Pixel 6A चे स्पेसिफिकेशन्स 

गुगलच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2,340 x 1,080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला Corning Gorilla Glass 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन सारखे अनेक भन्नाट फीचर मिळतात. 

यात Titan M2 सिक्योरिटी प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये Google Tensor चिप मिळते जिचा वापर या सीरिजमधील फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये देखील करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनी 5 वर्ष सिक्योरिटी अपडेट आणि 3 वर्ष अँड्रॉइड अपडेट देणार आहे. फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. 

कॅमेरा सेटअप पाहता या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 12.2MP चा मेन कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेट मध्ये 4306mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की Extreme Battery Saver मोड ऑन करून सिंगल चार्जमध्ये 72 तास ही बॅटरी वापरता येईल.  

किंमत 

याची किंमत 499 डॉलर म्हणजे (जवळपास 38,614 रुपये) आहे. हा फोन 3 कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याची भारतीय किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.   

Web Title: Google Pixel 6A India Launch Timeline And Price In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.