शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Google Payचा नवा लोगो पाहून फसाल; अपडेट केल्य़ावर मोबाईलमध्ये शोधून दमाल

By हेमंत बावकर | Updated: November 5, 2020 16:07 IST

Google Pay : गुगल पे भारतीय युजरसाठी नवीन लोगो दिवाळीपूर्वी जारी करण्याची शक्यता आहे. नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार असून गुगल पे चे फायनल व्हर्जनही लवकरच उपलब्ध केले जाणार आहे.

गुगलने क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करण्याचा इशारा दिलेला असताना आता आणखी एक पेमेंट अॅप गुगल पे (Google Pay) बुचकळ्यात टाकणार आहे. गुगल पेचा सुरुवातीपासूनचा लोगो बदलला जाणार आहे. यामुळे फसायला होण्याची चिन्हे आहेत. कारण त्यावर आता जी हे अक्षरच नसणार असून यु आणि एनचा मिलाप असणार आहे. 

गुगल पे भारतीय युजरसाठी नवीन लोगो दिवाळीपूर्वी जारी करण्याची शक्यता आहे. नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार असून गुगल पे चे फायनल व्हर्जनही लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. 9to5Google वेबसाईटच्या रिपोर्टनुसार गुगल पेच्या नवीन लोगोमध्ये U आणि N इंटरलॉक केला आहे. हा लोगो 3D वाटतो. वेगवेगळी रंगसंगती यामध्ये वापरण्यात आली आहे. या नव्या लोगोत लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे.  

Google Pay हे अ‍ॅप  भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते. यामुळे आधी एवढे लोकप्रिय न झालेले अ‍ॅप  हळूहळू भारतीयांच्या मोबाईलमध्ये दिसू लागले. गुगलचा जी आणि पे अशी अक्षरे असलेला लोगो आहे. यामुळे सध्यातरी हे अ‍ॅप  सहज ओळखता येते. मोबाईलमध्ये भारंभार अ‍ॅप  इन्स्टॉल असतात. त्यातून नेमके गुगल पे अ‍ॅप  शोधून काढणे सध्यातरी  सोपे आहे. परंतू आता नवीन लोगो आल्यास मात्र, फसायला होण्याची मोठी शक्यता आहे. कारण यावर कुठेही गुगलचा जी किंवा पे लिहिलेले नाही. 

Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट अ‍ॅप बनले आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे. अद्याप कंपनीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यापूर्वीही google ने आपल्या अनेक ऍपच्या लोगोमध्ये बदल केले होते. मात्र सोशल मीडियावर, या लोगो किंवा आयकॉनमध्ये बदल केल्याने कन्फ्युजन होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

 

असा असेल नवीन लोगो....

टॅग्स :google payगुगल पेgoogleगुगल