शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay शोधून सापडतेय का बघा? अनइन्स्टॉल झालेय का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:46 IST

Google Pay Logo, name changed : Google Pay हे अ‍ॅप  भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते.

डिजिटल वॉलेटसाठी भारतीयांचा Google Pay कडे जास्त ओढा आहे. फोन पे ने या अ‍ॅपला मागे टाकलेले असताना गुगुल पेद्वारे अनेकदा दुकानदाराला, कोणाला पैसे पाठवायचे असतील तर लगेचच पाठविले जात आहेत. परंतू या गुगल पे अ‍ॅपमध्ये मोठा बदल झाला आहे. अनेकांना गेल्या काही दिवसांपासून गुगल पे मोबाईलमध्ये शोधूनही सापडत नाहीय. (google pay logo and name changed second time in India.)

 गुगल पेचा सुरुवातीपासूनचा लोगो बदलण्यात आला आहे. नवीन अपडेटमध्ये हा बदल झाला आहे. काहींच्या मोबाईलवर अद्यापही जुने गुगल पे दिसत आहे. प्ले स्टोअरवरही त्यांना अपडेट आलेली नाही. मात्र, ज्यांना ही अपडेट आलीय त्यांना लोगो बदलाबरोबरच नावातही बदल झाल्याने मोबाईलमध्ये गुगल पे सुरुवातीला सापडत नाहीय. 

गुगुल पेच्या नावात दुसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. हे दुसरे नाव Gpay असे ठेवण्यात आले आहे. यामुळे सवयीप्रमाणे Google Pay शोधायला गेल्यास आता जुने गुगल पे दिसत नसल्याने चुकून अनइन्स्टॉल झाले की काय असा समज होण्याची  शक्यता आहे. यामुळे जर Google Pay सापडत नसेल तर सर्चमध्ये Gpay टाईप करावे, जेणेकरून तुम्हाला गुगल पेने पेमेंट करता येणार आहे. 

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय

 नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार होता. गुगल पेच्या नवीन लोगोमध्ये U आणि N इंटरलॉक केला आहे. हा लोगो 3D वाटतो. वेगवेगळी रंगसंगती यामध्ये वापरण्यात आली आहे. या नव्या लोगोत लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग वापरण्यात आला आहे. 

Barcode Scanner App मध्ये आला व्हायरस, गुगलने प्ले स्टोरवरून हटवलं; फोनमधून लगेचच करा डिलीट

2017 पासून दुसरा मोठा बदलGoogle Pay हे अ‍ॅप  भारतात तेझ या नावाने 18 सप्टेंबर 2017 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने नाव बदलून ते Google Pay केले होते. यामुळे आधी एवढे लोकप्रिय न झालेले अ‍ॅप  हळूहळू भारतीयांच्या मोबाईलमध्ये दिसू लागले. गुगलचा जी आणि पे अशी अक्षरे असलेला लोगो आहे. यामुळे सध्यातरी हे अ‍ॅप  सहज ओळखता येते. मोबाईलमध्ये भारंभार अ‍ॅप  इन्स्टॉल असतात. त्यातून नेमके गुगल पे अ‍ॅप  शोधून काढणे सध्यातरी  सोपे आहे. परंतू आता नवीन लोगो आल्यास मात्र, फसायला होण्याची मोठी शक्यता आहे. कारण यावर कुठेही गुगलचा जी किंवा पे लिहिलेले नाही. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट अ‍ॅप बनले आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे. 

टॅग्स :google payगुगल पेgoogleगुगल