शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

Google Payचं नवं फीचर; आता चेहरा दाखवून पैसे होणार ट्रान्सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 11:11 IST

 गुगल पेचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्लीः गुगल पेचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलनं आपल्या डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्मला आणखी अद्ययावत केलं असून, आता चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. गुगल पेला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर जोडण्यात आलं असून, Google Pay अ‍ॅपवरून आता कोणतेही डिजिटल व्यवहार करताना ग्राहक बायोमॅट्रिक पद्धतीनं चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर करण्याच्या फीचरचा वापर करू शकतात.या नवीन फीचरला अँड्रॉइड 10बरोबर रोलआऊट करण्यात आलं आहे. तत्पूर्वी गुगल पेच्या माध्यमातून एखादा व्यवहार करताना युजर्सला पिन टाकावा लागत होता. परंतु नव्या अपडेटनंतर त्यात बदल झाला आहे. गुगलनं आता याला biometric APIचा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे युजर्स पैसे दुसऱ्याला ट्रान्सफर करण्यासाठी अंगठ्याचा ठसा  (fingerprint authentication) आणि चेहरा दाखवून पैसे ट्रान्सफर (face authentication) या सुविधांचा वापर करू शकतो. हे नवं फीचर पिनहून अधिक जलद गतीनं काम करणार आहे. अँड्रॉइड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, ज्या फोनमध्ये अँड्रॉइड 10 व्हर्जन आहे, त्या फोनवर हे फीचर काम करणार आहे. पण हे फीचर्स लवकरच अँड्रॉइड 9मध्येही लाँच करण्यात येणार आहे. युजर्सला पर्यायात असलेलं Sending Moneyचं सेक्शन खाली सापडणार आहे. युजर्स PINमध्ये बायोमेट्रिक किंवा दोन्ही पर्यायांचा वापर करू शकतो. बायोमॅट्रिक सिक्युरिटी फीचर फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देण्यात आलं आहे. या नवीन फीचरला 2.100 व्हर्जनसोबत रोल आऊट केलं आहे. 

टॅग्स :googleगुगल