शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुगलने ChatGPT 'चा घेतला धसका! सुंदर पिचाई यांनी त्यांच्या टीमला 'हे' आदेश दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:35 IST

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ChatGPT ची चर्चा सुरू आहे. हे टूल Google Search सारखे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ChatGPT ची चर्चा सुरू आहे. हे टूल Google Search सारखे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. आता गुगलच्या एका निर्णयामुळे चॅटजीपीटीनं गुगल सर्चसाठी अडचणी निर्माण केल्याचं स्पष्ट झालं आहे. ChatGPT हा Open AI Nan च्या कंपनीने तयार केलेला चॅटबॉट आहे. एका आठवड्यात या चॅटबॉटला करोडो वापरकर्त्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी याकडे गुगल सर्चचा प्रतिस्पर्धी म्हणूनही पाहत आहेत. 

एका अहवालानुसार, ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता गुगलने कोड रेड जारी केला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी टीमला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या उत्पादनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Google ची मूळ कंपनी Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांनी Google AI धोरणाबाबत बैठका घेतल्या आहेत. चॅटजीपीटीला कसे सामोरे जावे, म्हणजेच चॅटजीपीटीकडून गुगल सर्चला येणाऱ्या संभाव्य धोक्यांसाठी कोणती पावले उचलली जावीत यावर  कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.

NYT ने Google चे काही अंतर्गत मेमो आणि ऑडिओ प्राप्त केले आहेत. चॅटजीपीटीमुळे गुगल सर्चचे किती नुकसान होऊ शकते आणि त्याचा कसा सामना करता येईल याबाबत कंपनीचे व्यवस्थापन धोरण तयार करत आहेत. गुगल रिसर्च, ट्रस्ट आणि सेफ्टी डिव्हिजनसह काही इतर टीमना आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित उत्पादने आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काही कर्मचाऱ्यांना एआय-आधारित टूल्स तयार करण्यास सांगितले आहे जे मजकूरावर आधारित ग्राफिक्स तयार करू शकतात. ओपन एआयने काही दिवसापूर्वीच DALL E सादर केले होते. काही लिहले की त्या आधारावर तो तुम्हाला ग्राफिक्स किंवा आर्टवर्क बनवेल. DALL E देखील ChatGPT प्रमाणे लोकप्रिय झाले आहे आणि ही दोन्ही टूल्स Open AI ने तयार केली आहेत.

टॅग्स :googleगुगल