शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:02 IST

गुगलचा हा इव्हेंट पूर्णपणे एआयवर केंद्रीत आहे. यामध्ये जेमिनी 2.5, गुगल बीम, इमॅजिन 4, व्हेयो 3 सारखी अनेक AI टूल्स सादर करण्यात आली.

गुगलने 'गुगल आय/ओ २०२५' ची धमाकेदार सुरुवात केली आहे. तुम्ही सिनेमात पाहिले असेल पाकिस्तानी लष्करी अधिकारी हिंदीत बोलतो आणि चीनमध्ये बसलेल्या चिनी अधिकाऱ्याला चिनी भाषेत ऐकता येते. सेम तसेच आता प्रत्यक्षात येणार आहे. गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.

गुगलचा हा इव्हेंट पूर्णपणे एआयवर केंद्रीत आहे. यामध्ये जेमिनी 2.5, गुगल बीम, इमॅजिन 4, व्हेयो 3 सारखी अनेक AI टूल्स सादर करण्यात आली. जेमिनी आता जीमेल, मीट, मॅप, कॅलेंडर सारख्या अॅप्समध्ये जोडले जात आहे. गुगल बीम खूप खास असणार आहे. 

गुगल बीम हा 3D व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म असून त्याद्वारे रिअल-टाइम स्पीच ट्रान्सलेशनही करता येणार आहे. एआयचा वापर यासाठी करण्यात येत आहे. एचपीच्या डिव्हाईसमध्ये याचा वापर सुरुही झाला आहे. याद्वारे नैसर्गिक ऑडिओ तयार होतो. म्हणजेच कृत्रिम बोलणे वाटत नाही. यासाठी सध्या दोनच भाषा वापरण्यात येत असून यात हिंदी देखील असणार आहे. मराठीच्या वापराबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतू, भविष्यात आपली भाषा देखील यात अंतर्भूत होण्याची शक्यता आहे. 

व्हेओ ३ हे इमेजेन ४ आणि जेमिनी मॉडेल्सवर आधारित एआय फिल्ममेकिंग टूल आहे. हे नैसर्गिक भाषेच्या प्रॉम्प्टमधून व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करते. इमॅजिन ४: नवीन इमेज जनरेशन मॉडेल असून टेक्स्टवरून इमेज तयार करते. 

गुगल AI सर्च:गुगल सर्चमधील एआय मोड अमेरिकेत देण्यात आला असून याद्वारे तुम्ही उत्पादनांची तुलना करणे किंवा तिकिटे बुक करणे यासारख्या जटिल प्रश्नांची उकल करू शकता. याच 'डीप सर्च' फीचर देण्यात आले असून ते शेकडो पेजेस वापरून अहवाल तयार करते. 

टॅग्स :googleगुगल