शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Google: कहर! गुगलच्या या लोकप्रिय अ‍ॅपने जगाच्या लोकसंख्येलाही मागे टाकले; सर्वाधिक डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:32 IST

Most downloaded app in the world: जगातील सर्व अँड्रॉईड फोनमध्ये हे अ‍ॅप इनबिल्ट येते, यामुळे ते डाऊनलोड करण्याची वेळच येत नाही. मग एवढे नंबर कसे आले हा देखील कोड्यात टाकणारा विषय बनला आहे.

जुलै 2021 पर्यंत जगाची लोकसंख्या (world's population) ही 7.9 अब्ज नोंदविली गेली आहे. मात्र, गुगलच्या (Google) एका अ‍ॅपने यापेक्षाही जास्त वेळा डाऊनलोड मिळविले आहेत. चकीत झालात ना, एवढी लोकसंख्या तरी मोबाईल वापरते का, असा प्रश्न पडला असेल. परंतू हे खरे आहे. (Google's youtube app download more than world's population.)

गुगलच्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईडने यंदा 3 अब्ज डिव्हाईस अ‍ॅक्टिव्हेशनचा टप्पा गाठला आहे. याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अ‍ॅपची संख्या ही 2.89 दशलक्ष झाली आहे. यात युट्यूब (youtube app) हे असे अ‍ॅप आहे जे जगात सर्वाधिक वेळा आणि जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. युट्यूब हे आजवर 10 अब्जांहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. (Youtube 10 billion downloads.)

युट्यूब जगातील सर्व अँड्रॉईड फोनमध्ये इनबिल्ट येते, यामुळे ते डाऊनलोड करण्याची वेळच येत नाही. मग एवढे नंबर कसे आले हा देखील कोड्यात टाकणारा विषय बनला आहे. प्ले स्टोअरवर दुसरे लोकप्रिय अ‍ॅप फेसबुक आहे. हे अ‍ॅप 7 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप तिसऱ्या नंबरवर असून 6 अब्ज वेळा डाऊनलोड केले आहे. धक्कादायक म्हणजे फेसबुक मॅसेंजर चौथ्या स्थानी आहे आणि 5 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. इन्स्टाग्राम 3 अब्ज डाऊनलोडसह पाचव्या स्थानी आहे. (List of most-downloaded Google Play applications)

TikTok 2 अब्ज डाऊनलोड, सबवे सर्फर्स 1 अब्ज, फेसबुक लाईट 2 अब्ज, Microsoft Word आणि Microsoft Powerpoint 2 अब्ज वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. स्नॅपचॅट 1 अब्जहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. (which app more time download in world? Google's youtube download more than world's population)

टॅग्स :googleगुगलYouTubeयु ट्यूब