घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:58 AM2022-09-19T09:58:43+5:302022-09-19T10:00:05+5:30

करीने ट्विटर बायोवर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो एक  स्वयंघोषित हॅकर आहे. तो वेब अॅप्लिकेशनची सुरक्षितता समजावण्यासाठी एक ब्लॉग चलवतो और युग लॅब्समध्ये एक सुरक्षा इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. 

google has mistakenly paid a huge amount of rs 2 crore to a hacker a man Accidental become crorepati  | घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक 

घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक 

Next

Google ने एकाएकी एका व्यक्तीला कोट्यधीश बनवले आहे. हे ऐकूण आपल्यालाही थोडे विचित्र वाटत असेल. Google ने एका हॅकरच्या अकाउंटवर चुकून 2 कोटी रुपये जमा केल्याने तो कोट्यधीश बनला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, Google कडून हे पेसे परत घेणेही राहून गेले. ही माहिती स्वत: हॅकरने शेअर केली आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणात Google सोबत संपर्क साधण्याचा काही मार्ग आहे? अशी विचारणाही सॅम करी (@samwcyo) या एका स्वघोषित हॅकरने केला आहे.

हॅकरने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक स्क्रीनशॉटही शेअर करत, "Google ने मला 249,999 डॉलर पाठवून 3 आठवड्यांहून अधिक दिवस झाले आहेत. आपला संपर्क होऊ शकेल, असा काही मार्ग आहे @ गूगल? (जर आपल्याला हे परत नको असतील, तर ठीक आहे...)". सॅम करीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर दिसत आहे, त्याला ऑगस्ट महिन्यात Google कडून 250,000 डॉलर (जवळपास 2 कोटी रुपये) मिळेल आहेत. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गूगलकडून एवढी रक्कम का मिळाले, हे हॅकरलाही माहीत नाही.

कोन आहे सॅम करी? -
करीने ट्विटर बायोवर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो एक  स्वयंघोषित हॅकर आहे. तो वेब अॅप्लिकेशनची सुरक्षितता समजावण्यासाठी एक ब्लॉग चलवतो और युग लॅब्समध्ये एक सुरक्षा इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. 

काय म्हणालं गूगल -
एनपीआरच्या एका रिपोर्टनुसार, 'आमच्या टीमने नुकतेच चुकून चुकीच्या पार्टीला पैसे ट्रान्सफर केले आहेत. यासंदर्भात प्रभावित भागीदाराने आम्हाला त्वरित माहिती दिल्याबद्दल आम्ही त्याचे कौतुक तरतो. आम्ही हे व्यवस्थित करण्यासाठी काम करत आहोत,' असे Google म्हटले आहे.

 

Web Title: google has mistakenly paid a huge amount of rs 2 crore to a hacker a man Accidental become crorepati 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.