शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बापरे! Google Chrome 'या' मोडमध्ये करतो तुमचा डेटा ट्रॅक; वापर करत असाल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 14:37 IST

Google Chrome Data Track : गुगलने सर्व युजर्सना एक मोठा धक्का देत याबाबतचा खुलासा केला आहे

जगभरात ब्राऊझिंगसाठी गुगल क्रोम (Google Chrome) चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्मार्टफोन असो किंवा मग संगणक, सर्व इंटरनेट युजर्स Google Chrome मध्ये ब्राऊझ करतात. गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये Incognito मोडदेखील मिळतो. म्हणजेच आपल्याला प्रायव्हसी हवी असेल अथवा सिक्रेट ब्राऊझिंग करायचं असेल तर या मोडचा वापर हा हमखास केला जातो. मात्र आता हा Incognito मोडही सुरक्षित नसल्याची माहिती समोर आली आहे.  गुगलने सर्व युजर्सना एक मोठा धक्का देत याबाबतचा खुलासा केला आहे. Incognito मोडवरही ट्रॅकिंग केलं जातं. 

गुगल क्रोमकडे तुम्ही Incognito मोडवरुन केलेल्या ब्राऊझिंगबाबतचा ट्रॅक रिपोर्ट असतो. या माहितीनंतर अमेरिकेतील तीन युजर्सनी गुगलला थेट कोर्टात खेचलं आहे. तसेच त्यांनी कंपनीवर तब्बल 3600 कोटी रुपयांचा खटला भरला आहे. गुगलने आपल्या स्पष्टीकरणात आम्हाला असं वाटत होतं की, लोकांना माहिती असेल की आम्ही Incognito मोडवरही त्यांना ट्रॅक करतो असं म्हटलं आहे. तसेच गुगलने पुढे Incognito म्हणजे invisible नव्हे असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे क्रोम युजर्सकडे एक कॉमन सेन्स असायला हवा की, त्यांचा डेटा ट्रॅक केला जात आहे. 

कॅलिफोर्नियाच्या एका न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले आहे की ते कंपनीविरूद्धचा खटला रद्द करणार नाहीत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकन जिल्हा न्यायाधीश लुसी कोह (Lucy Koh) यांन दिलेल्या माहितीनुसार, कंपनी युजर्सचा डेटा ट्रॅक करत आहे, याबाबतची माहिती गुगलने त्यांच्या युजर्सना दिली नाही. गुगलने कोर्टात दावा दाखल केला आहे की, Incognito चा अर्थ invisible असा होत नाही. जर या मोडचा वापर करत युजरला कोणत्याही वेबसाईटवर जायचे असेल तर त्या वेबसाइटची माहिती ट्रॅक केली जाईल. त्याच वेळी त्या वेबसाईटवर उपस्थित थर्ड पार्टी सर्व्हिसेसनाही युजर्सविषयीची माहिती मिळते. 

गुगलने त्यांच्या निवेदनात पुढे Incognito मोड युजर्सना कोणत्याही अ‍ॅक्टिव्हिटीशिवाय ब्राऊझ करण्याची परवानगी देतो. म्हणजेच या मोडच्या मदतीने तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी तुमचं डिव्हाईस किंवा ब्राऊझर रेकॉर्ड करत नाही. मात्र तुम्ही या मोडमधे कोणत्याही वेबसाईटवर गेल्यास तुमचा डेटा कलेक्ट केला जातो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याच दरम्यान गुगल क्रोम ब्राऊजर (Google Chrome Browser) आता युजर्ससाठी आणखी कडक सुरक्षा (Security) करण्याच्या तयारीत आहे. गुगल क्रोम लवकरच एचटीटीपीला (http) डिफॉल्ट रुपात वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळी युजर्स एचटीटीपी (http) आणि एचटीटीपीएस (https) प्रीफिक्स लिहिण्यास विसरतात, त्यावेळी हे उपयोगी ठरणार आहे. 

Google Chrome ब्राऊजर आता आणखी सेफ; कडक सिक्योरिटीचा युजर्सला फायदाच फायदा होणार, जाणून घ्या कसा

ब्राऊजरची सुरक्षा वाढवण्यासाठी क्रोम इंजिनिअर्सनी केलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. सध्या एखाद्या युजरने एखादी लिंक टाईप केल्यास, क्रोम एड्रेस बार (यूआरएल), क्रोम प्रोटोकॉलची चिंता न करता टाईप केलेली लिंक लोड करतो. मात्र युजर्सनी प्रोटोकॉल न जोडल्यास, आता क्रोम प्रीफिक्स http जोडेल आणि http च्या माध्यमातून डोमेन लोड करण्याचा प्रयत्न करेल. क्रोम सुरक्षा इंजिनिअर एमिलि स्टार्कने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल क्रोम 90 मध्ये बदल असेल. Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग आपोआप धोकादायक जाहिरातींपासून युजर्सचं संरक्षण करेल आणि धोकादायक साईट्सवर भेट देण्यापूर्वी किंवा संशयास्पद फाईल डाउनलोड करण्यापूर्वी युजर्सला इशारा देईल, यामुळे युजर्सला मोठा फायदा होणार आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानAmericaअमेरिका