शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

Happy Birthday Google! लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा आज 21 वा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:50 IST

लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा आज 21 वा वाढदिवस आहे. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

ठळक मुद्देआज लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा 21 वा वाढदिवस आहे. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात.

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. मात्र आज लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा 21 वा वाढदिवस आहे. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे. 

गुगलने 27 सप्टेंबर 1998 ही तारीख एका संगणकाच्या डेस्कटॉपवर दाखवली आहे. गुगलचं एक सर्च पेज दाखवण्यात आलं आहे. गुगलचा जुना लोगोही दिसत आहे. संगणकासोबतच कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटरही दाखवण्यात आला आहे. 1998 मध्ये सर्गी ब्रिनआ णि लॅरी पेज यांनी गुगलची स्थापना केली होती. सुरुवातीला गुगलचं नाव 'Backrub' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ते बदलून गुगल असं ठेवलं आहे. 

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी गुगल हे सर्च इंजिन सुरू केलं. या सर्च इंजिनने 20 वर्षांत खूप प्रगती केली गुगल 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगभरात गुगलची कार्यालये आहेत. तसेच मोठ्या संख्येने लोक त्याचा वापर करतात.

नोकरी शोधणं होणार आणखी सोपं; Google ने लॉन्च केली 'ही' नवी सर्व्हिस

गुगलने  Google Pay च्या माध्यमातून नोकरी शोधण्यासाठी एक पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. गुगल पे च्या माध्यमातून तरुणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  गुगलने Google Job Search हे फीचर याआधी लॉन्च केले आहे. मात्र आता अशाच पद्धतीचे फीचर हे गुगल पे अ‍ॅपमध्ये युजर्सना मिळणार आहे. या फीचरचा तरुणांना नोकरी शोधण्यासाठी फायदा होणार आहे. तसेच याच्या माध्यमातून बेसिक आणि पार्ट टाईम जॉब शोधण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी गुगलने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. गुगल पे मध्ये नोकरी संबंधी एक पर्याय देण्यात येणार आहे. त्यामध्ये युजर्स आपलं प्रोफाईल तयार करू शकतात. तसेच शिक्षण आणि अनुभव याची माहिती देऊ शकतात. 

खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचरगुगलने भारतात Android TV साठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. वाय-फाय कनेक्शन नसणाऱ्या तसेच मोबाईल डेटा आणि हॉटस्पॉटच्या मदतीने टीव्ही पाहणाऱ्या युजर्ससाठी खास गुगलने हे नवं फीचर आणलं आहे. यासोबतच गुगलने एक कास्ट फीचर लॉन्च केलं आहे ज्याच्या मदतीने युजर्स डाऊनलोड केलेल्या मीडिया फाईल्स देखील टीव्हीवर पाहू शकणार आहेत. गुगलच्या वतीने जोरिस वान मेंस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डेटा सेव्हर, डेटा अलर्ट्स आणि हॉटस्पॉट गाईड असे फीचर्स असणार आहेत. लिमिटेड मोबाईल डेटावर स्मार्ट टीव्ही पाहणाऱ्या भारतीय युजर्ससाठी ते लॉन्च करण्यात आले आहेत. पहिलं फीचर डेटा सेव्हरच्या मदतीने वॉच टाईम जवळपास तीन पटीने वाढवला जाऊ शकतो असा दावा गुगलने केला आहे. तसेच मोबाईल कनेक्शनवर कमी डेटाचा वापर केला जाईल. किती डेटा आतापर्यंत वापरला गेला तर किती शिल्लक आहे याची माहिती ही डेटा अलर्ट्स युजर्सना देणार आहे. हॉटस्पॉट गाईड युजर्सना मोबाईल हॉटस्पॉटसोबत टीव्ही सेटअप करण्यासाठी मदत करणार आहे.  

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलtechnologyतंत्रज्ञान