काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:22 PM2021-09-10T18:22:35+5:302021-09-10T18:32:39+5:30

Google apps like maps gmail and youtube will be closed : महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधील Google Maps, YouTube, आणि Gmail सारखे अ‍ॅप्सचे सपोर्ट बंद करण्यात येणार आहे.

google apps like maps gmail and youtube will be closed on millions of phones know reason | काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद 

काय सांगता? ...म्हणून लाखो फोनमधील Maps, Gmail आणि Youtube सारखे गुगल अ‍ॅप्स होणार बंद 

Next

नवी दिल्ली - जगभरातील लाखो स्मार्टफोन्सवरगुगलचे पॉप्युलर अ‍ॅप्स बंद होणार आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत लाखो स्मार्टफोन्समधील Google Maps, YouTube, आणि Gmail सारखे अ‍ॅप्सचे सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. गुगलने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड 2.3 व्हर्जनचा वापर करणाऱ्या युजर्संना 27 सप्टेंबरपासून आपल्या फोनवर गुगल अकाऊंट लॉगिन करता येणार नाही. गुगल अँड्रॉईड 2.3 ऑपरेटिंग सिस्टम डिसेंबर 2010 मध्ये आणले होते. जी आता खूपच जास्त जुनी झाली आहे. 

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी जुन्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करणे परत घेत आहे. कंपनी नेहमीच अँड्रॉईड सॉफ्टवेयरच्या जुन्या व्हर्जनचा सपोर्ट परत घेत असते. ऑपरेटिंग सिस्टमच्या जुन्या व्हर्जनला बग आणि हॅकर्स सहज लक्ष्य करू शकतात. सध्या अँड्रॉईड 11 सर्वात लेटेस्ट अँड्रॉईड व्हर्जन आहे. लवकरच अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टम येणार आहे.

YouTube, Google Play Store, Google मॅप्स, Gmail, Google कॅलेंडर

गुगलच्या या निर्णयाने अँड्रॉईड 2.3 व्हर्जनवर सुरू असलेल्या डिव्हाइसवर गुगल अकाऊंट चालणार नाहीत. युजर्संनी योग्य डिटेल्स टाकल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड एरर दिसेल. डिव्हाईसच्या सेटिंग मेन्यूमध्ये गुगल कॅलेंडर किंवा जीमेल अकाऊंट जोडण्यावर एरर दिसेल. गुगलचे जे अ‍ॅप आहेत ते काम करणे बंद करतील. त्यात YouTube, Google Play Store, Google मॅप्स, Gmail, Google कॅलेंडरचा यामध्ये समावेश आहे.

अपग्रेड करा आपला फोन

गुगलच्या पॉप्युलर अ‍ॅप्सचा वापर जारी ठेवण्यासाठी तुम्हाला आपला स्मार्टफोन अँड्रॉईड 3.0 मध्ये अपग्रेड करावा लागणार आहे. यासाठी तुमच्या डिव्हाईसच्या सेटिंगमध्ये जावून सिस्टममध्ये जा. त्यानंतर Advanced वर टॅप करुन System Update वर जा. परंतु, अँड्रॉईड 2.3 चालवणारे सर्वच डिव्हाईस पुढील व्हर्जनमध्ये अपग्रेड होणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

Web Title: google apps like maps gmail and youtube will be closed on millions of phones know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.