नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(TRAI) प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. TRAIनुसार, 16 डिसेंबर म्हणजे आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (Mobile Number Portability)ची प्रक्रिया आणखी सहजसोपी झाली आहे. आता कोणताही युजर्स आपला ऑपरेटर सहजगत्या बदलू शकणार आहे. आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवडा ते 15 दिवसांचा अवधी लागायचा, परंतु नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल. ट्रायनं ही प्रक्रिया आणखी सोपी केली असून, यूनिक पोर्टिंग कोड (UPC)ची फक्त अट ठेवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, सर्व्हिस एरियाच्या आत जर कोणताही नंबर पोर्ट करण्याची मागणी आल्यास ती 3 कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी 5 कामकाजांच्या दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात ट्रायनं नवं परिपत्रक जारी केलं आहे. कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या मर्यादेत कोणताही बदल नाही.
महत्त्वाची बातमी! आजपासून बदलला SIM कार्डशी संबंधित नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:53 IST