शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खूशखबर! आता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:00 IST

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे.

मुंबई -  डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI वापरायची परवानगी व्‍हॉट्‍सॲपला देण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे UPI द्वारा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. मात्र सध्या तरी हि सुविधा फक्त बीटा व्हर्जनसाठी आहे. 

अॅन्ड्रॉइडच्या 2.18.41 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं आहे. तर iOS यूजर्सला पेमेंटचे अपडेट V2.18.21 या व्हर्जनवर उपलबद्ध असेल. व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.  काही युजर्सनं याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

कसे होतील पैसे ट्रान्सफर? या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यात सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल. ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल. या नंतर तुम्ही यातून बॅंकेचे नाव सिलेक्ट करुन पेमेंट करु शकता. मात्र यासाठी दोन्ही युजर्सकडे हे पेमेंट फिचर असणे आवश्यक आहे. 

 

दरम्यान,  वीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात. परंतू आता व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू केली आहे सध्या व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत. यापूर्वी  व्हॉट्सअॅपने इंस्टंट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केली होती. तसेच 2016 मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआय सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाइल युझर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप