व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:10 PM2023-03-30T14:10:02+5:302023-03-30T14:12:07+5:30

जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. 

Good news for Vodafone customers! List of Xiaomi, Redmi smartphones announced for 5G network... | व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...

व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...

googlenewsNext

व्होडाफोन भारतात लवकरच ५जी सेवा लाँच करण्याची तयारी करत आहे. एअरटेल, जिओच्या तुलनेत खूपच मागे राहिलेल्या या कंपनीने सुरुवातीला शाओमीच्या स्मार्टफोनवर ५जी सेवा उपलब्ध केली जाणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने यासाठी शाओमी आणि रेडमीच्या फोनवर ५जीची टेस्टिंग केली आहे. 

यासाठी जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. 

व्होडफोन देशात ५जी कधी सुरु करेल याबाबत साशंकताच आहे. असे असताना मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया २०२४ पर्यंत ५जी सेवा सुरु करेल. अद्याप कंपनीने याची माहिती दिलेली नाहीय.

ही आहे शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी... (Xiaomi, Redmi Vodafone 5G smartphone list)
Xiaomi 13 Pro, Redmi Note 12 Pro 5G, Redmi 11 Prime 5G, Redmi K50i, Redmi Note 12 Pro+ 5G, Redmi Note 12 5G, Xiaomi 12 Pro आणि Mi 11 Ultra यांचा समावेश आहे. तसेच Mi 11X Pro, Xiaomi 11T Pro 5G, Redmi Note 11T 5G, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 11 Pro 5G, Mi 11X, Mi 10, Mi 10T, Mi 10T Pro आणि Mi 10i यांचा समावेश आहे.

रिलायन्स जिओने सध्या 406 भारतीय शहरांमध्ये तर Airtel 500 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा देत आहे.

Web Title: Good news for Vodafone customers! List of Xiaomi, Redmi smartphones announced for 5G network...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.