शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

OnePlus वापरकर्त्यांसाठी खुशखबर! 'या' फोनची स्क्रीन मोफत बदलली जाणार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 09:44 IST

OnePlus Mobile : जर तुम्ही OnlePlus चे मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रँड अनेक मॉडेल्सचे डिस्प्ले विनामूल्य बदलत आहे.

OnePlus Mobile : OnePlus ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने निवडक स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी ग्रीन लाईन समस्या सोडवण्यासाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे. ग्रीन लाइनची समस्या भारतातील OnePlus फोनवर अनेकदा दिसून आली आहे. यामुळे ग्राहकांनी तक्रारीही केल्या होत्या, या तक्रारी सोडण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. 

ही समस्या OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R स्मार्टफोनमध्ये दिसली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनी या फोनच्या डिस्प्लेवर आजीवन वॉरंटी देत ​​आहे. आता कंपनीने एक नवीन ऑफर आणली आहे. ही नवीन ऑफर OnePlus च्या मोफत स्क्रीन अपग्रेड OnePlus Red Cable Club Royalty Program वर दिसली आहे. 

LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन

या ऑफर अंतर्गत, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus 9 आणि OnePlus 9R स्मार्टफोन वापरकर्ते मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा दावा करू शकतात. यासोबतच त्यांना देखभाल सेवाही मिळणार आहे.

अटी काय आहेत?

यासाठी कंपनीने अटही घातली आहे. विनामूल्य स्क्रीन बदलण्यासाठी तुमचा फोन डॅमेज नसला पाहिजे. तसेच, ते कोणत्याही थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटरमध्ये उघडू नये. तुमचा फोन या अटी पूर्ण करत असल्यास, तुम्ही मोफत स्क्रीन बदलण्यासाठी संपर्क करू शकता.

अहवालानुसार, कंपनी या प्रोग्राम अंतर्गत अॅडव्हान्स डिस्प्ले पॅनेल ऑफर करत आहे. नवीन स्क्रीन चांगली कामगिरी, मजबूत असेल. हे डिस्प्ले उच्च आर्द्रता आणि उच्च तापमान असलेल्या ठिकाणी काम करण्यासाठी डिझाइन केले आहेत.

ही ऑफर फक्त डिस्प्लेवर येणाऱ्या ग्रीन लाईनची समस्यावर सोडवण्यासाठी सुरू केली आहे. जुन्या AMOLED डिस्प्लेवर ही समस्या दिसून येते.  OnePlus फोनमध्ये दिसून येते. ही योजना आधीच तुटलेल्या फोनवर लागू होणार नाही. जर तुमचा फोन आधीच खराब झाला असेल किंवा तुम्ही थर्ड पार्टी सर्व्हिस सेंटरमध्ये तो दुरुस्त करून घेतला असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, ही योजना फक्त वरती दिलेल्या फोनसाठी आहे.

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइल