शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: January 08, 2018 3:44 PM

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी आपला गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रुपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलची खासियत म्हणजे यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय.

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी आपला गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रुपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलची खासियत म्हणजे यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ९ तासांचा व्हिडीओ प्ले-बॅक देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अलीकडच्या काळात व्हिडीओचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून पर्यायाने चांगली बॅटरी हा महत्वाचा घटक बनला आहे. या पार्श्‍वभूमिवर, गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आल्याचे मानले जात आहे. या टॅबलेटमध्ये ७ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्सचा असेल. याची रॅम १.५ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते २०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा यात दिलेला आहे.गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट मुलांनाही सुरक्षितपणे वापरता यावा याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी यात पेरेंटल कंट्रोलची सुविधा दिलेली आहे. यात मुलांना किती वेळ आणि नेमके कोणते फिचर्स/अ‍ॅप्स वापरता येतील यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तर याच्या जोडीला किडस मोडच्या माध्यमातून मुलांना उत्तमोत्तम शैक्षणिक फिचर्स वापरता येतील. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.गॅलेक्सी टॅब ए ७.० हे मॉडेल काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात रिलायन्सच्या जिओचे २९९ रूपयांचे रिचार्ज करणार्‍या युजरला जिओमनीवर २ हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात हा कॅशबॅक १२ महिन्यानंतर ८०० रूपये तर २४ महिन्यानंतर १२०० रूपये या दोन टप्प्यांमध्ये मिळेल. मात्र यासाठी दरम्यानच्या कालखंडात युजरला दरमहा जिओचे रिचार्ज करावे लागणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलsamsungसॅमसंग