शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Flipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 16:42 IST

Flipkart Festive Dhamaka Days sale : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी सेल आणला आहे. हा सेल 24 ऑक्टोबरला सुरु होणार असून 27 ऑक्टोबरला संपणार आहे. 

नवी दिल्ली : फ्लिपकार्ट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा सेलचा धमाका घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी फ्लिपकार्ट कंपनीने ऑनलाइन मार्केटमध्ये बिग बिलियन डेज या नावाने सेल आणला होता. कंपनी आता पुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांसाठी सेल आणला आहे. F

आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक ऑफर्स फ्लिपकार्टकडून देण्यात येणार आहेत. आगामी सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अ‍ॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि सोप्या पद्धतीने पेमेंट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे. यासोबतच, सेलमध्ये ‘rush hours’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना सुरुवातीच्या दोन तासांत म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत जादा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, ‘Dhamaka deals’ मध्ये दर आठ तासाला मोबाइल, लॅपटॉप आणि फॅशन कॅटगरीमधील वस्तूंवर नवीन ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर ‘price crash’ मध्ये ग्राहकांनी निवडलेल्या वस्तूंवर 10 टक्के जास्त डिस्काउंट मिळणार आहे. याचबरोबर, टीव्हीसह घरगुती वस्तूंच्या जवळपास 500 ब्रँड्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. 

(अवघ्या 5 दिवसात अॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून 15 हजार कोटींच्या सामानांची व्रिकी)

दरम्यान, अॅमेझॉन कंपनी सुद्धा बंपर सेल आणणार आहे.  ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे. 'Wave 2' सेल 24 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. हा सेल चार दिवसांचा असून 28 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता बंद होणार आहे. आधीचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 10 ते 15 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता. 

(खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट)

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टamazonअॅमेझॉन