खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:47 AM2018-10-18T10:47:19+5:302018-10-18T10:48:11+5:30

Amazon Festival Sale : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे.

amazon great indian festival sale starts again from october-24 | खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट

खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट

googlenewsNext

नवी दिल्ली : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे. 'Wave 2' सेल 24 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. हा सेल चार दिवसांचा असून 28 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता बंद होणार आहे. आधीचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 10 ते 15 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता. जाणून घ्या, या सेलमधील खास ऑफर्स...

दररोज रेडमी 6A स्मार्टफोनचा फ्लॅश सेल
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये शाओमीचा रेडमी 6A स्मार्टफोनसाठी रोज दुपारी 12 वाजता प्लॅश सेल आयोजित केला जाणार आहे. तसेच, भारतात जास्त विकले जाणारे काही पसंतीचे स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. 

90 टक्क्यांपर्यंत सूट
अॅमेझॉनच्या फॅशन प्रॉडक्ट्सवर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच, 15 टक्के एक्स्ट्रा कॅशबॅक देण्यात येणार आहे. तसेच, घरगुती वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसोबत 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, टीव्हीवर 60 टक्के आणि इतर अप्लायंससहित काही वस्तूंवर 80 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे.

डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर
कॅशबॅक ऑफर्सबाबत सांगायचं झाल्यास, आयसीआयसीआय आणि सिटी बँकेच्या ग्राहकांनी या सेलमध्ये खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स असणार आहेत. 

दोन तासांत वस्तूंची अल्ट्रा- फास्ट डिलिव्हरी
बंगळुरु, दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबादमध्ये राहणारे लोग प्राइम नाऊ अॅपच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तू दोन तासांत अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरीचा फायदा घेऊ शकतात. 

Web Title: amazon great indian festival sale starts again from october-24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.