बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा  

By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 06:16 PM2021-09-21T18:16:17+5:302021-09-21T18:36:17+5:30

Flipkart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या तारखेची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान नवीन लाँच झालेले स्मार्टफोन्स देखील विकत घेता येतील.  

Flipkart big billion days sale date announced everything to know  | बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा  

बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा  

Next

Flipkart लवकरच आपला फेस्टिव्ह सेल सुरु करणार आहे. The Big Billion Days सेलची सुरवात 7 ऑक्टोबरला होणार आहे आणि हा सेल 12 ऑक्टबर पर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये विविध श्रेणीतील वस्तूंवर डिस्काउंट दिले जातील. यात घरात वापरायच्या वस्तूंचा समावेश तर असेलच परंतु त्याचबरोबर लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि गॅजेट्सवर देखील अनेक ऑफर्स मिळतील.  

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 ऑफर्स  

  • फ्लिप्कार्टवरील मायक्रोसाईटनुसार सेलमध्ये Axis आणि ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट मिळेल.  
  • Paytm वर वॉलेट आणि UPI ट्रँजॅक्शनवर देखील कॅशबॅक देण्यात येईल.  
  • Samsung, Apple, Oppo, Motorola आणि Vivo च्या फोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जाईल. काही ऑफर्स समोर आल्या आहेत तर सेलच्या आधी इतर ऑफर्स देखील समोर येतील.  
  • सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जाईल, असे फ्लिपकार्टने सांगितले आहे.  
  • होम अप्लायन्स आणि टीव्हीवर 70 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.  
  • Acer च्या लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.  
  • स्मार्ट वॉच 70 टक्के डिस्काउंटसह विकत घेता येतील.  
  • ऑडिओ ब्रँड Boat च्या प्रोडक्टवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल.  
  • रियलमीच्या सब-ब्रँड Dizo च्या अ‍ॅक्सेसरीज 60 टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील.  
  • सेलच्या आधी Samsung, Oppo, Motorola, Realme, Poco आणि Vivo या कंपन्या नवीन फोन्स सादर करणार आहेत जे या सेलमध्ये विकत घेता येतील.  

Web Title: Flipkart big billion days sale date announced everything to know 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app