शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

5g Spectrum Auction: 5G क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल; स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात, अंबानी सर्वात पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 11:19 IST

5g spectrum auction: देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. 

गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या 5G येणार असल्याच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण त्या दिशेने आज पहिले पाऊल पडणार आहे. आज 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे. या लिलावात जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलसह गौतम अदानींची Adani Data Networks बोली लावणार आहेत. यामध्ये खरी लढाई अदानी आणि अंबानींमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्यातरी स्पर्धा नसली तरी भविष्यात या दोन्ही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. 

72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव 4.3 लाख कोटी रुपयांवर सुरु होणार आहे. त्याची वैधता 20 वर्षे असेल. लिलावात यशस्वी ठरलेली कंपनी याद्वारे 5G सेवा देऊ शकणार आहे. विविध स्तरावरील बँड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विविध कमी वारंवारता बँड (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz), मध्यम (3300 MHz) आणि उच्च वारंवारता बँड (2GHz) मध्ये रेडिओ लहरींसाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

देशात पुढील काही महिन्यांत ५जी सेवा लाँच होणार आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह दहा शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरु केली जाईल. या सुपरफास्ट सेवेचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय फायदा होईल हे ही सेवा प्रत्यक्षात आल्यावरच समोर येणार आहे. पण 5G नंतर बरेच काही बदलणार आहे.

2000 च्या दशकात, बहुतेक लोक 2G किंवा 3G नेटवर्क वापरत होते. भारतात 4G च्या प्रवेशानंतर इंटरनेट स्पीडने मोठी क्रांती घडविली. व्हिडीओंच्या बाबतीत मोठी क्रांती झाली. व्हिडीओ पाहणे, व्हिडीओ कॉल करणे सोपे झाले. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्याला अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. 4G नेटवर्कवर आपल्याला 100Mbps पर्यंत वेग मिळतो, परंतु 5G वर तो Gbps मध्ये उपलब्ध असेल. 

5G नेटवर्क आणण्यासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे. पण गावे आणि छोट्या शहरांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलAdaniअदानीVodafoneव्होडाफोन