शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:48 IST

फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे.

फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे.

या मॉडेलचे मूल्य १९९५ रूपये आहे. सध्या अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर सुरू असलेल्या ‘प्राईम डे सेल्स’मध्ये हा फिटनेस बँड उपलब्ध करण्यात आला आहे. अर्थात यावर लाँच होत असतांना विविध सवलती प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या अंतर्गत कुणीही ग्राहकाने एचडीएफसी बँकेचे क्रेडीट वा डेबीट कार्ड वापरून याची खरेदी केल्यास त्याला तात्काळ १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच कुणाही प्राईम युजरने ‘अमेझॉन पे’ प्रणालीचा वापर करून याला खरेदी केल्यास त्यालादेखील १० टक्के रक्कम कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहे.

फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड हे मॉडेल आयपीएक्स६ प्रमाणित आहे. यामुळे याला पाण्यातदेखील वापरता येणार आहे. मात्र पोहण्यासाठी पाण्याशी दीर्घ काळ संबंध असतांना याला वापरता येणार नसल्याची बाब लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. यासोबत हे मॉडे डस्टप्रूफदेखील असल्यामुळे कोणत्याही वातावरणात याला सहजपणे वापरता येणार आहे. यात दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बहुतांश फिटनेस ट्रॅकरमध्ये बॅटरी हा महत्वाचा घटक असतो. या पार्श्‍वभूमिवर यातील बॅटरी उत्तम प्रकारातील असल्याचे दिसून येत आहे. अन्य फिटनेस ट्रॅकरप्रमाणे यातदेखील चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदींचे मापन करता येते. याशिवाय यामध्ये निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यामध्ये ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनचे विविध नोटिफिकेशन्स पाहता येणार आहे. यात कॉल, एसएमएस, व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर आदींशी संबंधीत नोटिफिकेशन्सचा समावेश राहणार आहे. ब्ल्युटुथ प्रणालीच्या मदतीने हा ट्रॅकर स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. तर अँड्रॉइड आणि आणि आयओएस अ‍ॅपच्या मदतीने युजर या ट्रॅकरचा वापर करू शकतो.

फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँडला शाओमीच्या मी बँड २चे तगडे आव्हान राहण्याची शक्यता आहे. यातील सर्व फिचर्स शाओमीच्या फिटनेस ट्रॅकरमध्ये असून याचे मूल्य १,५९९ रूपये इतके आहे. विशेष म्हणजे यात हार्ट रेट माॅनिटरची अतिरिक्त सुविधादेखील आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानFitness Tipsफिटनेस टिप्स