शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

Facebook ची 'ही' सुविधा लवकरच होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 9:52 AM

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे फेसबुकने एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख अ‍ॅप 'हाऊसपार्टी' चं एक क्लोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  'बोनफायर' या क्लोनिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. मात्र या महिन्यात हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता फेसबुकने त्यांची एक सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप व्हिडिओ चॅटचा प्रमुख अ‍ॅप 'हाऊसपार्टी' चं एक क्लोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार,  'बोनफायर' या क्लोनिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. मात्र या महिन्यात हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. या अ‍ॅपचं टेस्टिंग फेसबुकने 2017 मध्ये सुरू केलं होतं.

'बोनफायर' हे क्लोन अ‍ॅप मे महिन्यात बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.  या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला शिकता आल्या, त्यांचा उपयोग भविष्यात लाँच होणाऱ्या अन्य गोष्टींसाठी आम्ही करू, असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुकवर 'हाऊसपार्टी' नावाची एक ग्रुप व्हिडिओ चॅटिंग सुविधा आहे. जी ओपन केल्यावर युजर्सना कोण-कोण ऑनलाईन आहे हे कळतं आणि ऑनलाईन असलेल्या हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडीओ चॅट करता येतं. फेसबुक इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर पण ग्रुप व्हिडीओ चॅटसारखे फीचर जोडत आहे. 

फेसबुकचा लूक लवकरच बदलणार; मार्क झुकेरबर्गने रिलीज केलं नवं डिझाईनफेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. कंपनीच्या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍ॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवं फीचर युजर्ससाठी प्रायवेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती  फेसबुकने दिली आहे. फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीवर फोकस करण्यात आलं आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि इनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे कम्युनिकेशन हे जास्त सुरक्षित होणार आहे.

फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे. मित्रांसोबत व्हिडीओ बघण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. तसेच हा  व्हिडीओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फीचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावर काम करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. चॅटिंग करताना तुमच्यात आणखी उत्साह निर्माण करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरमध्ये एक डेडीकेटेड स्पेस देण्यावर फेसबुक विचार करत आहे. ज्यामध्ये  तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना आवडीनुसार कंटेट मिळवता येणार आहे. तसेच तुम्ही काही लोकांनाच दिसू शकेल असा मॅसेज किंवा स्टोरी तयार करू शकाल. फेसबुक बिजनेससाठी मेसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यावर फेसबुक भर देत आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये लवकरच नव्या स्वरूपात जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येणार आहे. अपॉइंटमेंट हे नवं फीचरसुद्धा यामध्ये अ‍ॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्हाला हॉटेलचं बुकींग करता येणार आहे.

Facebook अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित आहे का?; 'या' सिक्युरिटी टिप्स करतील मदत!

क्रेब्स ऑन सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकने युजर्सचे पासवर्ड प्लेन टेक्स्टच्या स्वरूपात साठवून ठेवले आहेत. ते कंपनीमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी सहजपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे पासवर्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशा पद्धतीने युजर्सचे पासवर्ड लीक होणे शक्य नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. एखाद्या युजरने आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर कंपनीच्या टीमकडून तत्काळ डिलीट केली जाते. 

Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार 

गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

 

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान