शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

काय सांगता? Facebook वर आता दिसणार नाहीत लाईक्स; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 15:33 IST

फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता फेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत.

ठळक मुद्देफेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत. फेसबुक एका नव्या फीचरवर काम करत असून यामध्ये युजर्स आपल्या पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करू शकतात. सध्या या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे.

नवी दिल्ली - फेसबुक हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता फेसबुक युजर्सना फोटो आणि पोस्टना मिळालेले लाईक्स दिसणार नाहीत. फेसबुक एका नव्या फीचरवर काम करत असून यामध्ये युजर्स आपल्या पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करू शकतात. 

फेसबुकच्या या नव्या फीचरमध्ये सेटिंग बदल केल्यानंतर लाईक्स आणि रिअ‍ॅक्शन हे फक्त ज्या व्यक्तीने ती पोस्ट केली आहे त्यांनाच दिसणार आहेत. इन्स्टाग्रामवरही या फीचरचं टेस्टिंग घेण्यात आलं आहे. टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुक लाईक काऊंट हाईड करण्याचं हे फीचर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये देण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरपासून हे सुरू करण्यात येणार आहे. कंपनी या फीचरसाठी लोकांचा फीडबॅक घेणार आहे. 

फेसबुकवर पोस्ट अथवा फोटोला कमी लाईक्स मिळाले की अनेकजण निराश होतात. मात्र आता या नव्या फीचरमुळे अनेकांना फायदा होणार आहे. तसेच कमी लाईक्स मिळतात म्हणून अनेक लोक फेसबुकवर पोस्ट करायला घाबरतात किंवा केलेली पोस्ट काही वेळाने डिलीट करत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. त्यामुळेच फेसबुकने पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करण्याचा विचार केला आहे. सध्या या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. मात्र युजर्सना हे फीचर कधी मिळणार याबाबत फेसबुकने कोणतीही माहिती दिलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने भारतात आपले म्युझिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स गाण्याच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करू शकतात. तसेच फेसबुक प्रोफाईल आणि स्टोरीमध्येही यामुळे आवडतं गाणं ऐकवता येणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये म्युझिक स्टिकर, लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह सारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स बॉलिवूडची लोकप्रिय गाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वापरू शकतात. फेसबुकचं हे प्रोडक्ट 55 देशांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुक इंडियाचे डायरेक्टर आणि पार्टनरशिप हेड मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना प्लॅटफॉर्मवर गाण्यांच्या माध्यमातून अनेकांशी कनेक्ट होता येईल तसेच आपल्या भावना व्यक्त करता येतील हा कंपनीचा यामागे उद्देश आहे.

चॅटिंगची गंमत वाढवणारं फेसबुकचं 'हे' फीचर माहीत आहे का?फेसबुकवर अनेक फीचर आहेत मात्र फारच कमी युजर्सना याची माहिती आहे. फेसबुकवर फ्रेंड्स लिस्ट नावाचं एक फीचर असून या फीचरच्या मदतीने युजर्स आपल्याला हवी तशी नवी फ्रेंड लिस्ट तयार करू शकतात. फेसबुकवर वेगवेगळी फ्रेंड लिस्ट तयार करण्याचा पर्याय मिळते असल्याने हे फीचर युजर्ससाठी फायदेशीर आहे. युजर्सना त्यांच्या आवडीची फ्रेंड लिस्ट तयार करता येणार असल्याने चॅटिंगची गंमत वाढवणार आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट फ्रेंड लिस्टप्रमाणे योग्य आणि आपल्याला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येतील.

 

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान