शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Whatsapp युजर्सना मोठा झटका! Facebook वाचतंय तुमचे खासगी मेसेज; रिपोर्टमधून मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:56 IST

Facebook can able to read your private whatsapp message : व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी सातत्याने नवनवीन भन्नाट फीचर आणत असतं. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर्सना आत एक मोठा झटका बसला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

कंपनीने अनेकदा स्पष्ट केले आहे की, खासगी मेसेज पूर्णपणे सुरक्षित असतात व कंपनी देखील वाचत नाही. मात्र एका नवीन रिपोर्टमध्ये याउलट दावा करण्यात आला आहे. Propublica कडून आलेल्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक (Facebook) व्हॉट्सअ‍ॅपवरील खासगी मेसेज वाचू शकतं व शेअर देखील करू शकतं. या रिपोर्टविषयी सविस्तर जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅपने हजारपेक्षा अधिक लोकांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवले आहे, जे ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरच्या ऑफिसमध्ये असतात. तेथून कर्मचारी लाखो यूजर्सचे कंन्टेंट तपासतात.

कर्मचारी फेसबुकच्या सॉफ्टवेअरचा वापर करून युजर्सचे खासगी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतात. यासाठी कंपनी त्यांना पगार देते असं म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर साइन अप केल्यानंतर कंपनी त्यांना मेसेज पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करते. कंपनीचा दावा आहे की, मेसेज पूर्णपणे सुरक्षित असून, कंपनी देखील पाहू शकत नाही. मात्र, रिपोर्टमध्ये कंपनीचा हा दावा फेटाळण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे डायरेक्ट ऑफ कम्यूनिकेशन्स कार्ल वूग यांनी मान्य केले की, ऑस्टिन व अन्य ठिकाणी टीम चुकीचे व्यवहार करणाऱ्यांची ओळख पटवणे व त्यांना हटवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला रिव्ह्यू करते. मात्र केवळ अशा कंन्टेंटला रिव्ह्यू केले जाते, जे धोकादायक आहे. यामध्ये फसवणूक, चाइल्ड पोर्न आणि दहशतवादी कृत्य अशा गोष्टींचा समावेश आहे असा दावा केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज एन्क्रिप्टेड असतात, त्यामुळे त्यांना वाचण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टमची मदत घेतली जाते. असे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील शक्य आहे. एखाद्या युजरने कंन्टेंटच्याबाबतीत रिपोर्ट केल्यास असे मेसेज पाहिले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन