शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

फेसबुक मागत आहे युजर्सकडून ई-मेलचा पासवर्ड, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 11:01 IST

युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला आहे. दरम्यान फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या ई-मेलचा पासवर्ड मागत आहे. 

ठळक मुद्देफेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या  ई-मेलचा पासवर्ड मागत आहे. फेसबुकने काही युजर्सना त्यांच्या लॉग इन पेजवर एक मेसेज केला आहे. त्यामध्ये युजर्सना त्यांच्या पर्सनल ई-मेलचा पासवर्ड द्यावा लागत आहे. आम्हाला माहित आहे की अकाऊंट सुरक्षिततेसाठी पासवर्ड व्हेरिफीकेशनचा हा मार्ग बेस्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही तो बंद करण्याचा विचार करत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला आहे. दरम्यान फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांच्या ई-मेलचा पासवर्ड मागत आहे. 

डेलीबीस्टच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुकने काही युजर्सना त्यांच्या लॉग इन पेजवर एक मेसेज केला आहे. त्यामध्ये युजर्सना त्यांच्या पर्सनल ई-मेलचा पासवर्ड द्यावा लागत आहे. मात्र ज्या आयडीने हे फेसबुक अकाऊंट ओपन केलं आहे तो पासवर्ड देणं गरजेचं आहे. फेसबुक अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा ई-मेल आय डी द्यावा लागेल. त्यानंतर एका फॉर्मच्या माध्यमातून युजर्सना त्यांचा पासवर्ड विचारला जात आहे. याआधी युजर्सने अन्य डिवाईसवरून अकाऊंट ओपन केल्यास अशा प्रकराचे पर्याय मिळत होते. आम्हाला माहित आहे की अकाऊंट सुरक्षिततेसाठी पासवर्ड व्हेरिफीकेशनचा हा मार्ग बेस्ट नाही आहे. त्यामुळे आम्ही तो बंद करण्याचा विचार करत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. त्यामुळे अकाऊंटच्या अधिक सुरक्षिततेसाठी यासारखाच एक नवा पर्याय निवडण्यासाठी फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या युजर्सकडे त्यांचे पासवर्ड मागत असल्याची माहिती मिळत आहे. 

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीकफेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. सायबर स्पेस कंपनी अपगार्डच्या वृत्तानुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. त्यातील एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे. किती युजर्सच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे याबाबत नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या अ‍ॅपने 22 हजार फेसबुक युजरचे 'अनप्रोटेक्टेड' पासवर्ड स्टोर केले आहेत. 

Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट 

काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली होती. फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे स्पष्ट केले होते. फेसबुकडून आता मार्क झुकेरबर्ग याच्या 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील काही पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग याचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजर्सचं काय, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट झाल्या असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली होती.

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्टफेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान