शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

#FaceAppChallenge : सावधान! FaceApp वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:57 IST

मोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देमोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे.फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  फेसअ‍ॅप हे 2017 साली लाँच करण्यात आले होते.

नवी दिल्ली - मोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण आपले म्हातारपणीचे फोटो शेअर करत आहेत. आपण म्हातारपणी कसे दिसू याचाच ट्रेंड सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फेसअ‍ॅप या अ‍ॅपच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत. फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कलाकार आणि क्रिकेटपटू ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर करत आहेत. फेसअ‍ॅप हे आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करतं. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितलं जातं. ओल्ड फेस फिल्टर वापरल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवल्या जातात. म्हातारपणी लोक कसे दिसतील हे दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते. 

ट्विटरवर Elizabeth Potts Weinstein नावाच्या महिलेने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये जर तुम्ही फेसअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुम्ही अ‍ॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देत आहात. तसेच महिलेने याचा पुरावा देत अ‍ॅपचं पॉलिसी पेज देखील शेअर केलं आहे. ही पोस्ट रीट्वीट करून अनेक लोकांनी प्रायव्हसीबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

एका आयओएस युजर्सनीसुद्धा या अ‍ॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं म्हटलं आहे. सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असं सेट केल्यानंतरही फोनधील फोटो अ‍ॅपला अ‍ॅक्सेस करता येतात असं म्हटलं आहे. फेसअ‍ॅप हे 2017 साली लाँच करण्यात आले होते. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली. मात्र आता अचानक हे अ‍ॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेटकरी हे अ‍ॅप वापरुन त्यांच्या म्हातारपणीचे फोटो शेअर करत आहेत. 

फेसअ‍ॅप हे आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. iOS वर या अ‍ॅपचं तीन दिवसांचं ट्रायल मिळतं. त्यानंतर हे अ‍ॅप वापरायचं असल्यास त्यासाठी पैसे द्यावे लागतात. या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर आणि फीचर्स आहेत. फेसअ‍ॅपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले असून या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण म्हातारपणी आपण कसे दिसू ते पाहत आहेत. तसेच या अ‍ॅपमध्ये अनेक फिल्टर आहेत. म्हणजे तरुणपण पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करणारे देखील काही फिल्टर आहेत. 

सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने देखील भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गोष्टी अपडेट होत असतात. एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड हे सातत्याने येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून #SareeTwitter  ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत. 

न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीविषयक एक आर्टिकल छापण्यात आले होते. या आर्टिकलमध्ये साडीची प्रतिष्ठा आणि इतिहास याबाबत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यावर साडीला प्रसिद्धी देण्यात आली. प्रमोट केलं गेलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीतील विजयानंतर बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अशा आशयाचा मजकूर आर्टिकलमध्ये छापण्यात आला आहे. या आर्टिकलमधील काही गोष्टींमुळे अनेकजण नाराज झाले. त्यानंतर काही महिलांनी आपले साडीतील फोटो ट्विटरवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे. 

टॅग्स :Face App Challengeफेसअ‍ॅप चॅलेंजInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया