शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बरंच काही व्यक्त करतात इमोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 13:57 IST

शब्द हरवले आहेत...हो खरंच... म्हणजे हल्ली शब्दांची जागा सांकेतिक भाषेनं घेतली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप एकूणच सोशल मीडियावर जिकडेतिकडे इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  

शब्द हरवले आहेत...हो खरंच... म्हणजे हल्ली शब्दांची जागा सांकेतिक भाषेनं घेतली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप एकूणच सोशल मीडियावर जिकडेतिकडे इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मौज, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असल्यास 'इमोटिकॉन्स'/'इमोजी'चा भडीमार केला जातो. ज्या पद्धतीनं मेसेजींगमध्ये क्रांती झालीय त्यानुसार 'व्यक्त होणार तर इमोजीतूनच... नाही तर नाहीच', असा पणच काहींनी केलाय की काय, असा प्रश्नच पडतोय. इमोजीच्या माध्यमातूनच भावना व्यक्त करण्याचा जमाना आहे, असंच म्हणावे लागेल. 

इमोजीचा नेहमी हलक्याफुलक्या, मौजमजेच्या संभाषणासाठी वापर केला जातो, असाच बऱ्याच जणांचा समज आहे. पण खरं तर तसे नाहीय. वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या अधे-मधे इमोजीचा वापर होत असल्यास, प्रत्येक वेळेस याचा अर्थ गंमतीशीर ठरू शकत नाही. इमोजीमुळे संभाषणाचा तसंच वाक्यरचनेचा अर्थ कधी-कधी बदलूही शकतो. उदाहरणार्थ गंभीर, उपरोधिकही होऊ शकतो, असे निरीक्षण एका अभ्यासाद्वारे नोंदवण्यात आले आहे. 

मानवी मेंदू ज्या प्रमाणे भाषेचा उपरोधिक भावना, टोमणे, टोला, टीका करण्यासाठी वापर करतो, त्याचप्रमाणे इमोजीचाही वापर होतो. एखाद्या इमोजीच्या वापरामुळे वाक्यामागील संपूर्ण अर्थ, भावना, गांभीर्य समजते, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.  इमोजी हे सर्वव्यापी आहे. केवळ सोशल मीडिया, मेसेज, ऑनलाइन चॅटिंगमध्येच नव्हे तर लेखी पत्र किंवा एखाद्या मेजेस तसंच मजकुरातही हल्ली इमोजीचा वापर आपण पाहतो, असे  University of Illinois (US)मधील डॉक्टरेट विद्यार्थी बेंजामिन वाईसमन यांनी सांगितले. 

शब्दांसहीत इमोजी वापर करणे हे एक प्रकारे Multimodal संभाषणाचे कौशल्य असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. यापद्धतीनं शब्द आणि हातवारे किंवा शब्द आणि चेहऱ्यावरील हावभाव हेदेखील Multimodal संभाषणाचे कौशल्य असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. ज्याप्रकारे आपण बोलून उपरोधिक किंवा कठोर-कटू भावना व्यक्त करू शकतो, त्याच पद्धतीनं इमोजीचा वापर करुनही या भावना व्यक्त होतात, असेही बेंजामिन यांनी सांगितले.

इमोजीच्या वापरासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी 106 जणांचा अभ्यासकांनी निरीक्षण केले. याद्वारे त्यांनी या सर्वांना इमोजीनंतरचे वाक्य वाचण्यास सांगितले व यावेळेस त्यांच्या मेंदूचाही अभ्यास करण्यात आला. शिवाय, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं वाक्यांचा काय अर्थ नोंदवून घेतला, हेदेखील त्यांना विचारण्यात आले. काही उदाहरणांमध्ये इमोजीद्वारे वाक्याचा शाब्दिक अर्थ जुळला, पण काही ठिकाणी इमोजीचा वापर उपरोधिकरित्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान,  शब्द, शब्द आणि चित्र, शब्द आणि हातवारे तसंच शब्द आणि इमोजी यांच्या वापरामुळे आपले संवाद कौशल्य वाढण्यास मदत होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. संभाषणात आपण केवळ वेगवेगळ्या इमोजीचा वापरू शकत नाही, मात्र जेव्हा आपण शब्दांसोबत इमोजीचा वापर करतो, तेव्हा ते एकमेकांचे महत्त्व वाढवतात. एकूणच  शब्द आणि इमोजीच्या एकत्रित वापरामुळे संभाषण कौशल्याबाबत योग्य तो परिणाम जाणवतो, असे अभ्यासकांनी सांगितले. 

Emoji आधी व्हायचा emoticons चा वापरइमोजीचा जन्म १९९० मध्ये झाला आणि यांना आधी emoticons असे म्हटले जायचं. emoticons (emotion + icon) या दोन शब्दांपासून तयार करण्यात आला होता. याचा वापर टेक्स्टच्या जागी केला जायचा. इमोजीला जपानी एक्स्प्रेशनही म्हटलं जातं. 

कोणी केले इमोजी तयार?१९९० मध्ये Shigetaka Kurita ने पहिला इमोजी तयार केला होता. Shigetaka Kuritaने हा इमोजी असलेला फोटो जपानच्या NTT Docomo या टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. लहान मुलांना व्यस्त ठेवण्याचा याचा उद्देश होता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया