शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; एका महिलेची Twitter च्या CEO पदी नियुक्ती, कोण आहे ती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:43 IST

नवीन महिला CEO लवकरच पदभार स्वीकारणार.

Twitter CEO: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे (Twitter) सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्विटरसाठी एका महिला सीईओ निवड केली आहे. नवीन सीईओ येत्या 6 आठवड्यात काम सुरू करणार असल्याची माहितीही मस्क यांनी दिली. मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.

ट्विटरच्या सीईओपदी असेल महिला आपल्या पायउतार होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती देताना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सापडला आहे. त्यांनी या महिलेचे नाव सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्टमधून एका महिलेचे नाव समोर येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, कॉमकास्‍ट एनबीसी युनिव्हर्सलची कार्यकारी लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) हिच्याशी इलॉन मस्क सध्या चर्चा करत आहेत.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “मी Twitter साठी नवीन CEO शोधला आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद होतोय. ती 6 आठवड्यांत काम सुरू करेल. तसेच, ट्विटरचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.''

ट्विटरवर व्हॉईस आणि व्हिडिओ चाटयाआधी 11 मे रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एन्क्रिप्टेड मेसेजिंग सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. ट्विटमध्ये ते म्हणाले, “एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेजची सुरुवातीची आवृत्ती नुकतीच लॉन्च झाली आहे. एकदा वापरून पहा, परंतु अद्याप त्यावर विश्वास ठेवू नका." ट्विटर आगामी काळात आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सादर करणार आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर