शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कामावर आले, पण गेटवरुनच परत पाठवलं! ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, मस्क यांच्यावर खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:15 IST

इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतील सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. याबाबत आता थेट इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतील सुमारे ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. याबाबत आता थेट इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. काढून टाकण्यात आलेली कर्मचारी संख्या ही एकूण कर्मचारी संख्येपेक्षा निम्मी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात गुरुवारी मस्क यांच्या विरोधात क्लास-अॅक्शन खटला दाखल करण्यात आला आहे.

ट्विटरमध्ये Work From Anywhere पॉलिसी बंद होणार, कर्मचाऱ्यांना कामावर परतावं लागणार!

ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची माहिती देणारे ईमेल पाठवले होते. कंपनीनं नुकतंच स्लॅक आणि अधिकृत ईमेल सारख्या अंतर्गत सेवांमधून अनेक संशयास्पद कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर त्यांना ट्विटरच्या वेतनातून काढून टाकल्याची घोषणा केली. 

इलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना धक्का; चिनी मातीचे बेसिन घेऊन पोहोचले मुख्यालयात

बहुतांश अमेरिकन मीडिया कंपन्यांनी प्रसारित केलेल्या अंतर्गत मेलनुसार, ट्विटर कर्मचार्‍यांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आणि जे ऑफिसला जात होते त्यांना परत जाण्यास सांगण्यात आलं आहे. ट्विटरनं कामावरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश बंदी केली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे की त्यांना कायम ठेवण्यात आले आहे, याची माहिती देण्यात येईल, असं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ज्यांना काढून टाकण्यात आलं आहे त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडीवर मेल पाठवला जाईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

ट्विटरमध्ये कर्मचारी कपात! इलॉन मस्क यांचा नवा झटका, 50 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रस्ता 

कंपनीत सुरू असलेल्या कपातीची चर्चा करण्यासाठी कर्मचारी एनक्रिप्टेड आणि निनावी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. रॉयटर्सच्या अहवालात एका वरिष्ठ कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार प्रशासन कर्मचाऱ्यांचा मागोवा घेत आहे. ज्या कर्मचार्‍यांना काढून टाकलेलं नाही त्यांनी देखील त्यांच्या माजी सहकाऱ्यांना रेफरल्स, आपल्या ओळखीनं मदत करण्याचं वचन दिलं आहे.

ट्विटरने आतापर्यंत कर्मचारी कपातीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आधीच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास तयार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Twitterट्विटर