'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 03:51 PM2023-09-25T15:51:04+5:302023-09-25T15:51:58+5:30

Elon Musk यांनी आपल्या Tesla Robot चा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा Video

Elon Musk Tesla Robot, 'Namaste', 'Surya Namaskar' and 'Yoga', Elon Musk shares Video of Humanoid Robot | 'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

googlenewsNext

Tesla चे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांनी Tesla च्या humanoid robot चा एक व्हिडिो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा रोबोट लोकांना नमस्ते करत असल्याचे दिसत आहे. Optimus, असे या रोबोटचे नाव आहे. Elon Musk यांनी या व्हिडिओसोबत कोणतेही कॅप्शन दिले नाही, पण व्हिडिओत सब टायटलद्वारे याची माहिती देण्यात आली आहे.

रोबोटने केले सूर्य नमस्कार
या रोबोटमध्ये Teslaच्या AI टेक्नोलॉजीचा वापर झाला आहे. मस्क यांनी X वर शेअर केलेल्या व्हिडिओत हा रोबोट काही टास्क करण्यासोबतच नमस्ते आणि सूर्य नमस्कार करताना दिसत आहे. व्हिडिोत रोबोट कलर बॉक्सला वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवताना दिसत आहे. व्हडिओतील सब टायटलमध्ये सांगण्यात आले आहे की, हा रोबोट सोप्या पद्धतीने नवनवीन गोष्टी शिकू शकतो.

स्पेस मिशनवर रोबोट
व्हिडिओत हा Humanoid Robot आपल्या हात-पायाची हालचाल करताना दिसतोय. रिपोर्टनुसार, रोबोट आता आपल्या व्हिजन आणि जॉइंट पोझीशन एनकोडरच्या मदतीने शरीराची हालचाल करू शकतोय. तसेच, या रोबोटला स्पेस मिशनसाठी वापरले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

किती असेल किंमत?
Optimus नावाच्या या रोटोबची किंमत 20,000 डॉलर (सूमारे 16,61,960 रुपये) असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या Humanoid Robot मध्ये .3 किलोवॅट प्रति तासांची बॅटरी पॅक लागली आहे, जो पूर्ण दिवस काम करण्यास सक्षम आहे. यात Wifi आणि LTE चा सपोर्ट मिळेल.

टेस्ला कारचे तंत्रज्ञान
Humanoid Robot Optimus मध्ये त्याच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर आणि सेंसरचा वापर झाला आहे, जे टेस्ला कारच्या अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टेंड सिस्टीम 'ऑटोपायलट' मध्ये वापरण्यात आले आहे. म्हणजेच, हा रोबोट टेस्ला चिपवर काम करतो.

2022 मध्ये केले होते लॉन्च
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात Humanoid Robot Optimus ची पहिली झलक पाहायला मिळाली होती. कंपनीने आयोजित कलेल्या 'Tesla AI Day' दिनी हा रोबोट जगासमोर आला होता. 

Web Title: Elon Musk Tesla Robot, 'Namaste', 'Surya Namaskar' and 'Yoga', Elon Musk shares Video of Humanoid Robot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.