शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

ट्विटर वापरण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 08:48 IST

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. यातच त्यांच्या एका ट्विटनं आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या काळात ट्विटरचा फुकटात वापर करता येणार नाही. त्यासाठी काही शुल्क भरावं लागणार आहे, असे संकेत इलॉन मस्क यांनी दिले आहेत. दरम्यान, सर्वसामान्य युझर्ससाठी ट्विटर मोफतच वापरता येणार आहे. 

"सर्वसामान्य यूझर्ससाठी ट्विटर नेहमीच फ्री राहील. पण व्यावसायिक आणि सरकारी यूझर्ससाठी ट्विटर वापरण्यासाठी काही शुल्क द्यावं लागू शकतं", असं ट्विट इलॉन मस्क यांनी केलं आहे. 

मेट गालामध्ये इलॉन मस्क यांची उपस्थितीइलॉन मस्क यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमधील मेट गालामध्ये उपस्थिती लावली. यादरम्यान, ते म्हणाले की ट्विटरच्या यशाची एक महत्त्वाची पायरी म्हणजे ते आपल्या वापरकर्त्यांचा लक्षणीय विस्तार करू शकतील. इतकंच नव्हे तर अमेरिकेच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग ट्विटरवर असावा आणि संवाद साधावा, अशी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

ट्विटरच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत जवळपास ट्विटरचे ४ कोटी डेली अॅक्टीव्ह यूझर्स आहेत. अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी ट्विटरचा वापर करावा अशी त्यांची इच्छा आहे. 

ट्विटरमध्ये मोठे बदल करण्याचा मस्क यांचा विचारइलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी तब्बल ४४ अब्ज डॉलरची डील केली आहे. यानंतर इलॉन मस्क आता कंपनीमध्ये अमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गाड्डे यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

ट्विटर खरेदी केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही पद्धतीमध्ये खूप महत्वाचं आहे असं वक्तव्य मस्क यांनी केलं होतं. ट्विटर एक डिजिटल टाऊन स्वेअर असून इथं मानवता आणि भविष्यावर चर्चा होत असते. त्यामुळे इथं प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, असं मस्क म्हणाले होते. तसंच ट्विटवर आणखी नवे फिचर्स आणण्याचीही इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर