बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 09:13 AM2021-02-03T09:13:59+5:302021-02-03T09:16:25+5:30

एलन मस्कने २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती जी एक अल्ट्रा हाय बॅंडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्यात बिझी आहे.

Elon Musk Neuralink human brain implants | बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप'

बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप'

googlenewsNext

स्पेसएक्स, टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क म्हणाले की, एका वर्षाच्या आत मानवी मेंदूमध्ये लावली जाणारी कॉम्प्युटर चिप तयार केली जाईल. आणि ती मानवी मेंदूत फिट केली जाईल. म्हणजे मानवी मेंदू थेट या चिपच्या माध्यमातून कॉम्प्युटरसोबत जोडला जाईल. एलन मस्कने २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती जी एक अल्ट्रा हाय बॅंडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्यात बिझी आहे.

जो रोगनच्या पॉ़डकास्ट शोमध्ये एलन मस्क म्हणाला की,  मनुष्याच्या मेंदूत चिप लावण्याचं काम एक रोबोट करेल. तो म्हणाला की, ही टेक्नीक २५ वर्षीय फूल ब्रेन इंटरफेसच्या रूपात तयार होऊ शकते. एलन मस्कचं असं मत आहे की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने मनुष्यांवर कंट्रोल मिळवू नये यासाठी मानवी मेंदू कॉम्प्युटरसोबत जोडणं गरजेचं आहे.

मस्कने सांगितले की, मानवी डोक्यातून एक तुकडा काढला जाईल. रोबोटच्या माध्यमातून इलेक्ट्रोड्स मेंदूत टाकला जाईल आणि छिद्रात डिवाइस लावलं जाईल. मस्क म्हणाला की, याने डोक्यावर एक छोटा डाग दिसेल. न्यूरालिंक एक अशी 'थ्रेड' तयार करण्यावर काम करत आहे की, जी मनुष्याच्या केसाच्या दहाव्या भागाऐवढी पातळ असावी. ही थ्रेड मनुष्याच्या ब्रेन इंज्युरीला ट्रीट करण्याात काम करेल.

मस्क म्हणाला की, आतापर्यंत या टेक्नीचा प्रयोग मनुष्यांवर करण्यात आलेला नाही. पण एका वर्षाच्या आत हे मनुष्याच्या मेंदूत लावली जाऊ शकते. तो म्हणाला की, एका माकडाच्या मेंदूत एक वायरलेस इंप्लांट लावण्यात आला आहे. या माध्यमातून माकड  आपला मेंदूचा वापर करून व्हिडीओ गेम खेळू शकतो.

मस्कने  सांगितले की, मेंदूत लावलं जाणारं डिवाइस १ इंच असेल. मेंदूत बाहेरील वस्तू ठेवण्याच्या धोक्याबाबत विचारले असता मस्क म्हणाला की, या डिवाइसच्या रिजेक्शनचा धोका फार कमी असेल.
 

Web Title: Elon Musk Neuralink human brain implants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.