शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, कमवा दर महिना 20 हजार रुपये; नोकरीसोबत पार्टटाईम इन्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:56 IST

Jio Partner Programme अंतर्गत आणले गेले आहे. युजर्स याद्वारे प्रीपेड रिचार्ज केल्यानंतर कमीशन देते. याला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता.

नवी दिल्ली - Reliance Jio चे JioPOS Lite ॲप युजर्सना नोकरीसोबतच पैसे कमवण्याची संधी देत आहे. हे Jio Partner Programme अंतर्गत आणले गेले आहे. युजर्स याद्वारे प्रीपेड रिचार्ज केल्यानंतर कमीशन देते. याला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या ॲपद्वारे जिओ आपल्या युजर्संना जिओ पार्टनर बनवणे किंवा अन्य जिओ ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज करणे आणि पैसे कमवण्याची  परवानगी देते. याचे रजिस्ट्रेशन खूपच सोपे आहे. जाणून घ्या या ॲप संबंधी हे कसे काम करते.

काय आहे JioPOS लाइट?

हे एक रिचार्ज करण्याचे प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप माय जिओ ॲप किंवा जिओ वेबसाइटसारखे आहे. JioPOS Lite तुम्हाला ॲपच्या माध्यमातून प्रत्येक रिचार्जवर कमिशन कमवण्याची संधी देते. याच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी कोमत्याही फिजिकल डॉक्यूमेंट्सची गरज पडत नाही. तुमच्याकडे फक्त जिओ नंबर असायला हवा.

किती मिळेल कमिशन?

या ॲपद्वारे जर तुम्ही रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला प्रत्येक रिचार्जवर 4.1 टक्के कमिशन मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 हजार रुपयाचे रिचार्ज केले तर तुम्हाला यावर 41.6 रुपये कमिशन दिले जाईल.

असे कमवा पैसे 

- सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store द्वारे अँड्रॉईडसाठी JioPOS Lite ॲप डाउनलोड करावे लागेल.

- एकदा ॲप डाउनलोड झाल्यानंतर याला आवश्यक परवानगी द्या. पुन्हा जिओ पार्टनर बनवण्यासाठी आपला जिओ नंबर आणि ईमेल आयडीला लॉगइन करा.

- रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲपच्या वॉलेट मध्ये 500 रुपये, 1 हजार रुपये, आणि 2 हजार रुपये ॲड करावे लागतील.

- यानंतर तुम्ही जितके रिचार्ज कराल त्यावर तुम्हाला 4.16 टक्के परत मिळतील.

या ॲपमधून बँक डिटेल्स मागितली जात नाही. तुमचे कमिशन ॲपच्या वॉलेटमध्ये जमा होते. याचा वापर बाकीच्या रिचार्जसाठी करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :JioजिओMONEYपैसा