शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लयभारी! पडला तरी तुटणार नाही Motorola Defy; बर्फात देखील वापरता येईल हा दणकट स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Updated: June 18, 2021 11:47 IST

Motorola Defy Launch: Motorola ने 2012 नंतर rugged श्रेणीत Motorola Defy नावाचा दणकट स्मार्टफोन लाँच केला आहे. 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून पडूनही Motorola Defy ला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही. 

Motorola एका Rugged SmartPhone वर काम करत आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार इंग्लंडमधील Bullitt Group ने बनवलेला हा पावरफुल स्मार्टफोन Motorola Defy नावाने लाँच झाला आहे. यापूर्वी 2012 मध्ये या सीरिजचा फोन मोटोरोलाने लाँच केला होता. कंपनीचा हा नवीन फोन Dust, Water आणि Drop Proof आहे. Rugged SmartPhone या श्रेणीतील फोन्स असेच मजबूत असतात.  (Motorola launches rugged smartphone Motorola Defy in a partnership with bullitt group)

Motorola Defy ची वैशिष्ट्ये  

Motorola Defy चा Corning Gorilla Glass Victus ने प्रोटेक्ट केला गेला. या फोनची बॉडी मजबूत प्लॉस्टिकपासून बनवण्यात आली आहे. हा फोन IP68 सर्टिफाइड आहे, त्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. तुम्ही हा फोन साबणाने किंवा इतर कोणत्याही द्रवाने साफ करू शकता, याला काही होणार नाही. हा फोन Dust, Water आणि Drop प्रूफ आहे, असा कंपनीने दावा केला आहे. म्हणजे धूळ, पाणी आणि उंचावरून पडल्यावर देखील हा फोन वापरता येईल.  

Motorola Defy स्मार्टफोन -25°C च्या थंडीत आणि +55°C पर्यंतच्या गर्मीत देखील काम करू शकतो, असे कंपनीने सांगितले आहे.  की गर्मी मध्ये पण काम करने की क्षमता रखता आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून देखील सुरक्षित राहील. एवढ्या उंचीवरून पडून देखील या फोनला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही, असे Motorola चे म्हणणे आहे.  

Motorola Defy चे स्पेसिफिकेशन्स 

हा फोन 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे, हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनसह येतो. फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित मोटोरोलाचा यूएक्स इंटरफेस आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 662 चिपसेट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात Motorola Defy 4 जीबी रॅमआणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.  

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. समोर फोनच्या वॉटर ड्रॉप नॉचमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, हि बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन €325 मध्ये लाँच केला गेला आहे, हि किंमत भारतीय चलनात 28,700 रुपयांच्या आसपास  रूपांतरित होते. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान