शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

आता Driving Licence ठेवायची गरज नाही, बिनधास्त चालवा कार, बाइक; ट्रॅफिक पोलीस चलन कापणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:54 IST

डिजीलॉकर किंवा डिजिटल लॉकरच्या मदतीने आपण व्हर्च्युअल डॉक्युमेंट्सचा सहजपणे वापर करू शकता. हे एक सरकारी अ‍ॅप आहे.

नवी दिल्ली - आपल्या सोबत असे अनेकवेळा घडले असेल की, आपण लायसन्स घरी विसरलात आणि बरोबर अशाच वेळी वाहतूक पोलिसांनी आपल्या गाडीची चेकिंग केली तथा चलन फाडले. एवढेच नाही, तर आपल्या कडे गाडीची इतर कागदपत्रे नसतील तर चलनाची रक्कमही वाढत जाते. आता आपल्यासोबत असे घडू नये यासाठी आम्ही एका अशा अ‍ॅपची माहिती देणार आहोत, जे आपला चलनापासून बचाव करेल. तसेच आपल्याला गाडीची इतर कागदपत्रेही ठेवावी लागणार नाहीत.

डिजी लॉकर अ‍ॅप -डिजीलॉकर किंवा डिजिटल लॉकरच्या मदतीने आपण व्हर्च्युअल डॉक्युमेंट्सचा सहजपणे वापर करू शकता. हे एक सरकारी अ‍ॅप असून, आपण यावर आपल्या वाहनाची कागदपत्रे सेव्ह केल्यास, चेकिंग दरम्यान आपल्या वाहनाचे चलन कापले जाणार नाही. विशेष म्हणजे हे अ‍ॅप वापरासाठी अत्यंत सोपे आहे. तसेच सध्या बरेच लोक या अ‍ॅपचा वापरही करत आहेत. 

हे एक डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. आपण येथे आपली कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पॉलिसी डॉक्युमेंट आदी स्टोअर करू शकता. यासाठी आपल्याला एक स्वतंत्र क्लाउड स्टोरेज स्पेसदेखील मिळेल, जो तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेला असेल.

या चार सोप्या स्टेजचा वापर करून आपण ऑनलाइन डिजिलॉकर ओपन करू शकता... -स्टेज 1 - डिजिलॉकर वेबसाइटवर जा. आपल्याला डिजिलॉकर digilocker.gov.in वर अ‍ॅक्सेस करता येईल. आपण प्ले/अ‍ॅप स्टोअरवरूनही आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमाने अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. याशिवाय, आपण डिजिलॉकर वेबसाइटवर जाऊन डिजिटल लॉकर खाते तयार करण्यासाठी आधार नंबरचा उपयोग करू शकता. यासाठी आपला फोन नंबर आधारशी लिंक असायला हवा.

स्टेज 2 - 'साइन अप'वर क्लिक करा. आपले संपूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर (जो आधारसी लिंक आहे.) टाका. एक पासवर्ड तयार करा आणि एक ईमेल आयडी टाका

स्टेज 3 - आपला आधार क्रमांक टाका. यानंतर आपल्याला दोन पर्याय येतील, एक असेल- वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आणि दुसरा असले-   फिंगरप्रिंट, पुढे जाण्यासाठी आपण कुठलाही पर्याय निवडू शकता.

स्टेज 4 - वापरकर्त्याचा आयडी - एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला 'वापरकर्त्याचे नाव' आणि 'पासवर्ड' तयार करावा लागेल. हे टाकल्यानंतर, साइन-अप बटनवर क्लिक करा. खाते यशस्वीपणे तयार झाल्यानंतर, अॅप्लिकेशन डिजिलॉकरची 'डॅशबोर्ड' स्क्रीन दाखवेल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसcarकारbikeबाईक