शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

By जयदीप दाभोळकर | Updated: July 28, 2021 15:59 IST

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात. 

ठळक मुद्देसध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात.देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात. 

WiFi Calling : सध्या बहुतांश स्मार्टफोन्स हे वायफाय कॉलिंगला सपोर्ट करतात. आपल्या पैकी काही जणांना वायफाय कॉलिंग काय आहे याची कल्पना असेल. परंतु काहींना या सुविधेमुळे होणारे लाभ कदाचित माहित नसतील. परंतु तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायफाय कॉलिंगची सुविधा असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्यायला हवा. अँड्रॉईड आणि आयओएसच्या बहुतांश डिव्हाईसेमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्या बहुतांश ठिकाणी, तर व्होडाफोन आयडिया ही कंपनी काही ठिकाणी ग्राहकांना वायफाय कॉलिंगची सुविधा देत आहे. हे स्मार्टफोनमधील एक इनबिल्ट फिचर असून तुम्हाला केवळ ते अॅक्टिव्हेट करायचं आहे. 

iPhone युझर्सना सर्वप्रथन फोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल आणि त्यानंतर मोबाईल नेटवर्कमध्ये वायफाय कॉलिंगचा ऑप्शन अनेबल करावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय कॉलिंग सुरू होईल. तर अँड्रॉईड फोन युझर्सनाही आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समधील नेटवर्क या ऑप्शनमध्ये जाऊन वायफाय कॉलिंग अनेबल करावं लागेल. 

Wi-Fi Calling ही अशाप्रकारची एक इंटिग्रेटेड सेवा आहे जी तुमच्या घरचं ब्रॉडबँड, ऑफिस ब्रॉडबँड किंवा पब्लिक वायफायसारख्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून व्हॉईस कॉलिंग करण्याची किंवा रिसिव्ह करण्याची सेवा देतं. या सेवेचा वापर करताना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नेटवर्क नसतानाही कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. 

कसं कराल सेटिंग ऑन?सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Wi-Fi and Internet या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. 

त्यानंतर तुम्हाला SIM and network मध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सीमकार्ड १ मध्ये किंवा २ मध्ये कोणत्या ठिकाणी हा ऑप्शन अनेबल करावं लागेल हे सिलेक्ट करावं लागेल. ही पद्धत तुम्हाला अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी वापरता येईल. 

iOS बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर मोबाईल डेटा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Primary Sim किंवा eSim वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला वायफाय कॉलिंगचा ऑप्शन अनेबल करा. तुमचा मोबाईव वायफाय कॉलिंगला सपोर्ट करतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायरच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनWiFiवायफायInternetइंटरनेटAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाReliance Jioरिलायन्स जिओAndroidअँड्रॉईड