खास गेमिंग मोडसह बजेट फ्रेंडली DIZO Buds Z इयरबड्स भारतात सादर 

By सिद्धेश जाधव | Published: September 24, 2021 11:34 AM2021-09-24T11:34:21+5:302021-09-24T11:38:47+5:30

Budget TWS Earbuds Dizo Buds Z: DIZO Buds Z ची किंमत कंपनीने 1,999 रुपये ठेवली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल अंतर्गत या बड्सवर 700 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल.

Dizo buds z earbuds launched in india know price and features  | खास गेमिंग मोडसह बजेट फ्रेंडली DIZO Buds Z इयरबड्स भारतात सादर 

खास गेमिंग मोडसह बजेट फ्रेंडली DIZO Buds Z इयरबड्स भारतात सादर 

Next
ठळक मुद्देDIZO Buds Z ची किंमत कंपनीने 1,999 रुपये ठेवली आहे. हे इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आले आहेत.

Realme ने आपल्या TechLife ब्रँड DIZO अंतर्गत नवीन DIZO Buds Z भारतात लाँच केले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 16 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच या ट्रू वायरलेस इयरबड्सची किंमत देखील किफायतशीर ठेवण्यात आली आहे.  

DIZO Buds Z ची किंमत 

DIZO Buds Z ची किंमत कंपनीने 1,999 रुपये ठेवली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल अंतर्गत या बड्सवर 700 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे 7 ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या सेल अंतर्गत DIZO Buds Z फक्त 1,299 रुपयांमध्ये विकत घेता येतील.  

DIZO Buds Z चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

DIZO Buds Z इयरबड्समध्ये कंपनीने 10mm डायनॅमिक ड्रायव्हरचा वापर केला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0 मिळते. फक्त 3.7 ग्राम वजन असलेल्या या बड्समध्ये खास गेमिंग मोड देण्यात आला आहे. या मोडमध्ये गेममधील आवाज वेळेवर ऐकता यावा म्हणून 88ms ची लो लेटन्सी देण्यात येईल. कॉलिंग करताना आजूबाजूचा आवाज कमी करण्यात यात ENC (एन्व्हायरमेंटल नॉइज कॅन्सलेशन) फीचर देण्यात आले आहे.  

हे इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आले आहेत. तसेच म्युजिक, व्हॉल्युम आणि इतर फंक्शन्स कंट्रोल करण्यासाठी यात टच कंट्रोल्स मिळतात. सिंगल चार्जमध्ये हे इयरबड्स चार्जिंग केससह 16 तासांचा म्युजिक प्लेबॅक देतात. तर फक्त इयरबड्स 4.5 तास बॅटरी बॅकअप देऊ शकतात. हे इयरबड्स तीन कलर ऑप्शन Onyx, Leaf आणि Pearl मध्ये सादर करण्यात आले आहेत.  

Web Title: Dizo buds z earbuds launched in india know price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app