शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोटो जी5एस व जी5एस प्लसवर डिस्काऊंट

By शेखर पाटील | Updated: December 20, 2017 15:21 IST

मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.

मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला मोबॅलिटी कंपनीने ऑगस्ट महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी जी५एस व जी५एस प्लस हे दोन स्मार्टफोन्स अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात सादर केेले होते. अमेझॉन इंडियाने आता या दोन्ही मॉडेल्सवर दोन हजार रूपयांची सूट जाहीर केली आहे. यामुळे हे दोन्ही स्मार्टफोन्स अनुक्रमे ११,९९९ आणि १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. सध्या तरी ही ऑफर फक्त अमेझॉन इंडियावरच सादर करण्यात आली आहे. यामुळे हा डिस्काऊंट मर्यादीत कालखंडासाठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोटो जी ५ एसमध्ये ५.२ इंच तर  मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. मोटो जी ५ एसमध्ये ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर तर मोटो जी ५ एस प्लस मॉडेलमध्ये ऑक्टॉकोअर ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो जी ५ एसची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर मोटो जी ५ एस प्लस मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज आहे. दोन्ही मॉडेलमध्ये इनबिल्ट स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.

मोटो जी ५ एस या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी असेल. तर या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश, वाईड अँगल लेन्स आणि एफ/२.० अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये टर्बो पॉवर चार्जरसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, ऑडिओ जॅक, फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आदी फिचर्स असतील. 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल