डिजिटल लॉकर

By अनिल भापकर | Published: August 3, 2018 11:45 AM2018-08-03T11:45:52+5:302018-08-03T11:54:22+5:30

आजच्या डिजिटल जमान्यात आणि प्रायव्हसीच्या नादात नवरा बायको देखील आपले पासवर्ड किंवा एटीएम पिन एकमेकाला सांगत नाही. मात्र जर दुर्दैवाने एखाद्याचे काही बरे वाईट झाले तर या डिजिटल संपत्तीचे काय ?

Digital Locker | डिजिटल लॉकर

डिजिटल लॉकर

googlenewsNext
ठळक मुद्देआजच्या डिजिटल जमान्यात आणि प्रायव्हसीच्या नादात नवरा बायको देखील आपले पासवर्ड किंवा एटीएम पिन एकमेकाला सांगत नाही. मात्र जर दुर्दैवाने एखाद्याचे काही बरे वाईट झाले तर या डिजिटल संपत्तीचे काय ?हल्ली स्मार्टफोनला सुद्धा पासवर्ड देण्याची पद्धत आहेच पण नवरा-बायकोला एकमेकांच्या स्मार्टफोनला हाथ लावलेला आवडत नाही. तसेच सोशल मीडियावर सुद्धा नवरा-बायको आपापली स्वतंत्र ओळख ठेवण्यासाठी धडपडत असतात.आपले डिजिटल संपत्तीचे डिटेल्स आपल्या जोडीदाराशी नक्की शेअर करून आपले डिजिटल लॉकर आणखी सुरक्षित करायला पाहिजे .

घरातील रोकड ,सोननाणं किंवा महत्वाचे कागदपत्रे घरातील एखाद्या संदूकमध्ये किंवा हल्ली बँक लॉकरमध्ये ठेवतात. ज्या संदूकमध्ये किंवा बँक लॉकरमध्ये हा पूर्ण ऐवज ठेवलेला असतो त्याची माहिती अर्थातच कुटुंबप्रमुखाला असतेच मात्र त्यासोबतच घरातील आणखी एखाद्या सदस्याला याची माहिती असते कारण जर समजा दुर्दैवाने कुटुंबप्रमुखाला काही झालेच तर घरातील सर्व ऐवज सुरक्षित राहावा. हि पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मात्र आजच्या डिजिटल जमान्यात आणि प्रायव्हसीच्या नादात नवरा बायको देखील आपले पासवर्ड किंवा एटीएम पिन एकमेकाला सांगत नाही. मात्र जर दुर्दैवाने एखाद्याचे काही बरे वाईट झाले तर या डिजिटल संपत्तीचे काय ?

डिजिटल संपत्ती म्हणजे काय ?

हल्ली सर्व काही डिजिटाईज करण्याची पद्धत आहे अर्थात घरातील संपत्तीचे महत्वाचे कागदपत्र स्कॅन करून त्याची डिजिटल कॉपी सेव्ह करून ठेवल्या जाते.त्याच प्रमाणे तुमचे महत्वाचे कागदपत्र जसे कि पॅन कार्ड , आधार कार्ड ,पासपोर्ट ,शैक्षणिक कागदपत्रे आदी सर्व सुद्धा स्कॅन करून ठेवले जातात . हे सर्व स्कॅन करून एकतर स्वतः च्या ई-मेल वर मेल करून ठेवले जाते किंवा एखाद्या क्लाउड स्टोरेज जसे कि गुगल ड्राईव्ह , ड्रॉपबॉक्स किंवा वनड्राइव्ह वर अपलोड करून ठेवले जाते. आजच्या टेक्नोसॅव्ही याला डिजिटल संपत्ती म्हणतात. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपले बँक एटीएम पिन ,क्रेडिट कार्ड पिन ,ऑनलाईन बँकिंग चे पासवर्डस ,ई-मेल आयडी, त्याचे पासवर्ड ,तसेच आजकाल जवळपास सगळेच सोशल मीडियावर अक्टिव्ह असतात ,म्हणजेच तुमचे पर्सनल फोटो आदी सोशल मीडियावर सर्रास अपलोड केले जातात ,आदींना सुद्धा डिजिटल संपत्ती म्हणू शकतो.

नेमका प्रॉब्लेम काय ?

हल्लीच्या टेक्नोसॅव्ही जगात आणि प्रायव्हसी च्या नादात नवरा-बायको सुद्धा आपल्या जोडीदाराला आपला एटीएम पिन किंवा ई-मेल चे पासवर्डस सांगत नाही . त्याचप्रमाणे हल्ली स्मार्टफोनला सुद्धा पासवर्ड देण्याची पद्धत आहेच पण नवरा-बायकोला एकमेकांच्या स्मार्टफोनला हाथ लावलेला आवडत नाही. तसेच सोशल मीडियावर सुद्धा नवरा-बायको आपापली स्वतंत्र ओळख ठेवण्यासाठी धडपडत असतात. म्हणजेच एकाच छताखाली राहून सुद्धा नवरा-बायको आपापले स्वतंत्र डिजिटल अस्तित्व ठेवण्याच्या नादात एकमेकांना वरीलपैकी काहीच शेअर करत नाही . दुर्दैवाने जर एखाद्या जोडीदाराचा मृत्यू झाला तर मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागतो . जसे कि बँक डिटेल्स तसेच ई-मेल चे पासवर्डस आणि  इतर डिजिटल संपत्तीचे डिटेल्स नसल्यामुळे अनके समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपले डिजिटल संपत्तीचे डिटेल्स आपल्या जोडीदाराशी नक्की शेअर करून आपले डिजिटल लॉकर आणखी सुरक्षित करायला पाहिजे .

Web Title: Digital Locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.