शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

युटिलिटी व्हेईकल आणि दुचाकींची मागणी वाढली; जून महिन्यात विक्रीमध्ये झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 00:51 IST

देशातील मोटरसायकलींची विक्री मे महिन्यापेक्षा वाढली आहे. जून महिन्यात ७,०२,९७० दुचाकी विकल्या गेल्या. मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ३५.१९ टक्के कमी झाले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून मंदीच्या विळख्यात सापडलेल्या वाहन उद्योगाला काहीसा दिलासा मिळू शकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जून महिन्यात देशातील दुचाकी तसेच युटिलिटी व्हेईकलची मागणी वाढली असून, त्यांच्या विक्रीतही आधीच्या महिन्यांपेक्षा वाढ झालेली दिसून आली आहे.देशातील विविध वाहनांच्या जून महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार देशातील स्कूटरची विक्री २,६९,८११ अशी झाली आहे. मागील वर्षाच्या जून महिन्याशी तुलना करता ही विक्री ४७.३७ टक्क्यांनी कमी असली तरी मे महिन्यापेक्षा त्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.देशातील मोटरसायकलींची विक्री मे महिन्यापेक्षा वाढली आहे. जून महिन्यात ७,०२,९७० दुचाकी विकल्या गेल्या. मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ३५.१९ टक्के कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ४०,६२० मोपेडचीही विक्री जून महिन्यात झाली. याशिवाय ३० इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.जून महिन्यात देशातील ४६,२०१ युटीलिटी व्हेईकल्सची विक्रीहीजून महिन्यात झाली. ट्रकपेक्षालहान असलेली मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारी वाहने म्हणजे युटीलिटी व्हेईकल होत. मालवाहतूक व अन्य कामांना ही वाहने उपयुक्तठरत असल्यामुळे त्यांना सध्यामागणी वाढत असल्याचे दिसूनआले आहे.ही आहेत वाहनांची विक्री वाढण्याची कारणे- मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापासून देशात असलेले लॉकडाऊन आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे बाजारातील आस्थापना सुरू झाल्या असून, उलाढालही वाढू लागली आहे. परिणामी वाहनांना मागणी वाढत आहे.कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंदच आहे. आस्थापना व कारखाने सुरू झाले असले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने कामावर जाणे अनेकांना त्रासदायक होत आहे. त्यामुळे स्वत:ची दुचाकी खरेदी करण्याकडे अनेक ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले आहे.ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे तेथेही कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांचा स्वत:चे वाहन वापरण्याकडे कल आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यापेक्षा दुचाकी खरेदी करण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात असल्याने दुचाकींची विक्री वाढत आहे.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय