शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

सलग दुसऱ्या वर्षी टीआरएच्या 'मोस्ट डिझायर्ड' यादीत Dell अव्वल क्रमांकावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 7:23 PM

Dell tops India's Most Desired Brands list : सलग दुसऱ्या वर्षीही भारतामध्ये मोस्ट डिझायर्ड ब्रँड अर्थात सर्वाधिक खपाचा ब्रँड म्हणून डेल लॅपटॉप्सने स्थान पटकावले आहे.

मुंबई : टीआरएच्या मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स २०२२ च्या अहवालात, सदर सिरीजमधील आठवा ब्रँड म्हणून सलग दुसऱ्या वर्षीही भारतामध्ये मोस्ट डिझायर्ड ब्रँड अर्थात सर्वाधिक खपाचा ब्रँड म्हणून डेल लॅपटॉप्सने स्थान पटकावले आहे. तर गॅजेटरी सुपर श्रेणी आणि मोबाईल श्रेणीमध्ये दुसऱ्या वर्षी आपले दुसरे स्थान MI ने टिकवून ठेवले आहे. भारतातील ३ रा मोस्ट डिझायर्ड ब्रँड म्हणून सॅमसंग मोबाईल फोनने पाचव्या स्थानावर झेप घेतली असल्याचे दिसून येते आहे. 

ऑटोमोबाईल सुपर श्रेणीमध्ये गेल्या अनेक काळापासून पाय रोवलेल्या मारूती सुझुकीला मागे टाकत भारतातील चौथ्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये १४ वा क्रमांक पटकावत बीएमड्ब्ल्यूने बाजी मारली आहे. तर टीआरएच्या वार्षिक यादीत पाचव्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये अठराव्या स्थानावर टायटनने झेप घेऊन आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. अहवालामध्ये दरवर्षी भारतातील १००० सर्वाधिक खपाच्या ब्रँड्सची यादी तयार करण्यात येते. 

१२७ वर्षीय जुना ब्रँड असणाऱ्या बाटाने मागील वर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी सुधारत सहाव्या स्थानावर झेप घेत २३ वे स्थान पटकावले आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सुपर श्रेणी आणि टेलिव्हिजन्स श्रेणीमध्ये असणाऱ्या अन्य अग्रगण्य एल.जी. टेलिव्हिजिन्सने सातवी जागा मिळविली असून चार क्रमांकाने वरची जागा मिळाली आहे. दरम्यान, आठव्या स्थानावर संपूर्ण भारतात यावर्षी अकरावी जागा पटकावत ह्युलेट पॅकार्ड लॅपटॉप्सने अत्यंत प्रभावी अशी उंची गाठली आहे. 

या यादीत नवव्या स्थानावर सोनी टेलिव्हिजन्सने तर नुकत्याच आयपीओमध्ये प्रवेश केलेल्या एलआयसीने २१ जागेवरून प्रभावी भरारी घेत भारतातील १० व्या सर्वाधिक खपाच्या ब्रँडमध्ये जागा घेतली आहे. याबाबत टीआरए रिसर्चचे सीईओ एन. चंद्रमौली यांनी भाष्य केले आहे. मागील कोविडच्या दोन वर्षांमध्ये अनेक चढउतार निर्माण झाले आणि ग्राहकांचे प्राधान्य आणि समज बऱ्यापैकी बदलले आहे. ब्रँडवरील ग्राहकांच्या उत्सुकतेचे सर्वात महत्त्वाचे मोजमाप म्हणजे ग्राहकांची इच्छा आहे, कारण ग्राहकांच्या मनात खोलवर रूजलेल्या मानसिक - सामाजिक - सांस्कृतिक गोष्टींचे मोजमाप याद्वारे होत असते, असे एन. चंद्रमौली यांनी सांगितले.

याचबरोबर, मनातील इच्छा या इतक्या खोलवर रूजलेल्या असतात की, त्यांना धक्का देणे सहसा शक्य नसते, पण अनेक ब्रँड्सने ग्राहकांसह नवा बंध निर्माण करत कोविड काळाचा योग्यरित्या वापर करून घेतला आहे, असे एन. चंद्रमौली म्हणाले. दरम्यान, टीआरएच्या मोस्ट डिझायर्ड ब्रँड्स २०२२ च्या भारतातील सर्व ब्रँड्सच्या स्थानांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://trustadvisory.info/tra/categoryMDB22.php या वेबसाइटला भेट देऊ शकता. 

टॅग्स :dellडेल