शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुगल सर्चमधून हटवा तुमची माहिती, वापरकर्त्यांना करता येणार मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:40 IST

नाव, पत्ता हटविणे होणार सोपे

एखादी गोष्ट माहीत नसेल किंवा माहिती करून घ्यायची असेल, तर हल्ली सर्रासपणे गुगल कर असे बोलले जाते. सोशल मीडियाच्या जगात गुगलला सर्वच गोष्टींची माहिती असते, असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीबाबत खासगी माहितीही गुगलवर सहजपणे उपलब्ध होते, पण आता तुम्ही तुमची खासगी माहिती गुगल सर्चवरून काढून टाकू शकता. जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गुगलचे पॉलिसी हेड मिचेल चँग यांनी कंपनीच्या नवीन अद्ययावत धोरणाविषयी माहिती दिली.

कशी हटवाल खासगी माहिती?खासगी किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी कंपनीने नवे धोरण आणले आहे. आता तुम्ही सर्च रिझल्टमधून तुमचे नाव, फोटो, मोबाइल नंबर, पत्ता किंवा ईमेल आयडी अशी खासगी माहिती हटविण्याची विनंती गुगलला करू शकता. त्यासाठी गुगलच्या हेल्पलाइन ईमेल आयडीवर मेल करावा लागेल.

गुगल करणार पुनरावलोकनतुमच्याकडून खासगी माहिती हटविण्याचा मेल मिळाल्यानंतर गुगलकडून त्याचे पुनरावलोकन केले जाईल. यानंतर, वापरकर्त्याच्या विनंतीनुसार, त्याचे वैयक्तिक तपशील गुगल प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जातील. ज्या माहितीमुळे वापरकर्त्याची कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे, केवळ अशी माहिती काढली जाईल, असेही गुगलने स्पष्ट केले आहे, शिवाय सरकारी किंवा अधिकृत स्रोतांच्या साइटवरील सामग्री सार्वजनिक रेकॉर्डचा भाग आहे की नाही, याचेही पुनरावलोकन केले जाईल.

टॅग्स :googleगुगल