शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी पेमेंट सुरू, कंपनीची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 22:19 IST

Cryptocurrency payment starts on WhatsApp : रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे  यासंदर्भात घोषणा केली.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस (WhatsApp Payment Service)जगभरात अतिशय संथ गतीने सुरू होत असली तरी कंपनीने आज एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप पे (WhatsApp Pay) वापरून आता अमेरिकेतील लोक एकमेकांना क्रिप्टोकरन्सी सुद्धा ट्रान्सफर (Transfer cryptocurrency using WhatsApp) करू शकतील.

9to5mac.com च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथकार्ड (Will Cathcard) आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कॅसरिअल (Stephane Kasriel) यांनी संयुक्तपणे  यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, नोव्ही (Novi) हे मेटाचे (Meta) डिजिटल वॉलेट देखील आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर केवळ काही लोकांपर्यंत पोहोचवले आहे. म्हणजेच, ज्या लोकांपर्यंत हे फीचर पोहोचले आहे, ते या मेसेंजर अॅपद्वारे पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतील.

नोवीच्या वेब पेजनुसार, ही सर्व्हिस पैसे पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा एक नवीन मार्ग आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे युजर्सला 'व्हॉट्सअ‍ॅप चॅट न सोडता' पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. दरम्यान, आता मेटा असलेल्या फेसबुकने (Facebook) व्हॉट्सअ‍ॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) पेमेंट करण्याच्या योजनेचा खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या एका रिपोर्टमध्ये Bloomberg ने म्हटले होते की, कंपनी एका 'stablecoin'वर काम करत आहे. 

याचबरोबर, तज्ज्ञांनी सांगितले की, कंपनी एक स्टेबलकॉइन (stablecoin) विकसित करत आहे. हे एक प्रकारचे डिजिटल चलन असेल, जे यूएस डॉलरसोबत जोडले जाईल आणि खूपच कमी व्होलॅटिलिटी (volatility) असेल. दरम्यान, हे लोक कंपनीच्या अंतर्गत योजनेवर चर्चा करण्यासाठी अधिकृत नाही आहेत. मात्र, आता तीन वर्षांनंतर लोकांना क्रिप्टोकरन्सी वापरून पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देण्यासाठी  व्हॉट्सअ‍ॅपने नोव्हीसोबत भागीदारी केली आहे. अमेरिकेशिवाय गुएटेमाला (Guatemala) याठिकाणी सुद्धा या सर्व्हिसची टेस्टिंग घेतली जात आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMONEYपैसाCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी