15 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह दोन जबरदस्त Smartwatch लाँच; ब्लड प्रेशर मॉनिटरसह झोप देखील मॉनिटर करणार
By सिद्धेश जाधव | Updated: February 12, 2022 20:20 IST2022-02-12T20:11:32+5:302022-02-12T20:20:26+5:30
Smartwatch: Slingshot आणि Snugar या वॉचेसमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. तसेच यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि IP67 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे.

15 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह दोन जबरदस्त Smartwatch लाँच; ब्लड प्रेशर मॉनिटरसह झोप देखील मॉनिटर करणार
Just Corseca या ब्रँडनं आपले दोन नवीन Smartwatch बाजारात सादर केले आहेत. ज्यांची नावं Slingshot आणि Snugar अशी आहेत. या वॉचेसमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. सोबत यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि IP67 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच फाईंड माय फोन, रिमोट कॅमेरा कंट्रोल, म्युजिक कंट्रोल आणि बेसिक वॉच फीचर्सना देखील सपोर्ट करतात.
Snugar Calling
हे स्मार्टवॉच तुमचं ब्लड ऑक्सिजन सॅच्युरायजेशन, स्लिप आणि ब्लड प्रेशर मॉनिटर करतं. कंपनीनं यात ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर दिला आहे. यातील 200mAh ची बॅटरी 5 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते तर 15 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो. यात 1.69 इंचाचा HD एलसीडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचच्या मदतीनं इनकमिंग कॉल्स अटेंड करता येतात किंवा रिजेक्ट करता येतात.
Slingshot
यात 1.69 इंचाचा एचडी एलसीडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 180mAH ची बटर 8 दिवसांचा बॅकअप देते आणि 10 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. यात हार्ट रेट सेन्सर, स्लिप मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन सॅच्युराजेशन आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग असे हेल्थ फिचर मिळतात.
किंमत
Corseca Snugar ची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Slingshot विकत घेण्यासाठी तुम्हाला 7,999 रुपये मोजगे लागतील. दोन्ही स्मार्टवॉच ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध होतील. सोबत एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: 19 हजारांपेक्षा कमी किंमतीत Lenovo चा जबरदस्त Laptop; फक्त काही दिवस मिळतेय ऑफर
- जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत