शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:25 IST

परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

ठळक मुद्देरिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. जिओने आपल्या लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर टेलिकॉम प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही आपल्या प्लॅनमध्ये कपात करावी लागली. परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा पॅक आहेत. पण कंपनीकडेही एक वार्षिक प्लॅनही आहे. आम्ही आपल्याला कंपनीच्या या दीर्घकाळ वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. जिओकडे एक प्लॅन आहे, ज्याची वैधता 360 दिवसांची आहे म्हणजे संपूर्ण वर्षभर. या प्रीपेड प्लॅनची किंमत 4,999 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 350 जीबी डेटा उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये आपणास जिओ ते जिओसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, तसेच जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटे मोफत मिळतील. म्हणजेच आपल्याकडे दरमहा 1,000 कॉलिंग मिनिटांचा पर्याय आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे. जिओचे हे प्रीपेड पॅक घेतल्यास आपणास जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळेल. एकंदरीत जिओच्या वर्षभराच्या वर्षभराच्या प्लॅनचं रिचार्ज केल्यास दरमहिन्याला रिचार्ज करावं लागणार नाही. आपण केलेले हे रिचार्ज एक वर्ष चालेल. जिओने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी प्रीपेड पॅकची वैधता वाढविली आहे. म्हणजेच जर वापरकर्त्याच्या प्रीपेड योजनेची वैधता संपली तर नि: शुल्क इनकमिंगची सुविधा चालू राहील जेणेकरून ते आपल्या मित्रांसह आणि कुटुंबाशी संपर्कात राहू शकतील.

Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे.  MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.

टॅग्स :Jioजिओcorona virusकोरोना वायरस बातम्या