Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:12 PM2020-04-18T12:12:37+5:302020-04-18T12:26:32+5:30

जिओचं इंटरनेट वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे.

Coronavirus : reliance jio let users to get incoming calls during lockdown vrd | Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

googlenewsNext

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्येतही वाढत होताना दिसत आहे. सरकारनं सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. त्यामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशातच जिओचं इंटरनेट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे.
 
रिलायन्स जिओने सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे.  MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.

डिजिटल रिचार्जः वापरकर्ते जिओ रिचार्ज, सेवा क्वेरी आणि विनंत्यांसाठी माय जिओ अॅप आणि Jio.comवर किती जोडलेले आहेत हेसुद्धा सुनिश्चित करत आहे.  Jio.com वेबसाइट 24/7 कार्यान्वित राहणार आहे.
फिजिकल रिचार्ज: मिळालेल्या माहितीनुसार, 20 एप्रिलनंतर अधिकाधिक रिचार्ज आऊटलेट उघडले जाणार आहेत.
थर्ड पार्टी रिचार्जः ग्राहक वॉलेट आणि फोन पे, पेटीएम, जीपे, अ‍ॅमेझॉन पे, मोबिक्विक, फ्री रिचार्ज सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्माचादेखील वापर करू शकतात.

जिओने वाढवली जिओ फायबर नेटवर्कची क्षमता 
रिलायन्सचं जिओ फायबर हे संकटाच्या काळातही आपल्या ग्राहकांना हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा देण्यास वचनबद्ध आहे. JioFiber ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनीने आपले कव्हरेज आर्थिक राजधानी मुंबईच्या प्रमुख भागात विस्तारित केले आहे. रिलायन्स जिओने लॉकडाऊनचा काळ पाहता मुंबईतील JioFiber नेटवर्कची क्षमता वाढविली आहे. डेटाची वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विश्वसनीय ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देत ​​आहे.
 

Web Title: Coronavirus : reliance jio let users to get incoming calls during lockdown vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.