शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आता गुगल इंडियाचे कोरोनाविषयक मराठी भाषेतील विशेष संकेतस्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 19:46 IST

आऱोग्यविषयक साक्षरता आणि सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून गुगलने हा उपक्रम हात घेतला आहे.

मुंबई – गुगल इंडियाने आता कोरोना विषाणू संदर्भात आता मराठीत इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ नेटिझन्सच्या भेटीला आणले आहे. सध्या सोशल मीडीयावर विविध मेसेज, पोस्ट सर्रास शेअर होताना दिसतात. मात्र बऱ्याचदा त्याची विश्वासार्हता पडताळली जात नाही, त्यामुळे आता गुगल इंडियाने मराठी भाषेत कोरोना विषाणूला समर्पित असणारे नवे संकेतस्थळ आणले असून या माध्यमातून जागतिक पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतची माहिती सर्वसामान्यांना मिळणे सुलभ होणार आहे.

या संकेतस्थळावर कोरोना (कोविड-१९) ची लक्षणे, हेल्पलाईन क्रमांक, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती असा सर्व तपशील असणार आहे. गुगल इंडियाचे www.google.com/covid19

हे संकेतस्थळ मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचे वर्गीकरण तीन टप्प्यांत केले असून त्यात आरोग्यविषयक माहिती, सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाय, सांख्यिक माहिती व स्त्रोत यांचा समावेश आहे. आऱोग्यविषयक साक्षरता आणि सामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून गुगलने हा उपक्रम हात घेतला आहे.

कोरोनाविषयक माहितीसह या संकेतस्थळात घरी बसून विलगीकऱण वा अलगीकरण प्रक्रियेत काय करावे, हात धुण्याची योग्य पद्धत, सामाजिक अंतर कसे राखावे, स्व विलगीकरण म्हणजे काय,  कोरोनाविषयीच्या अद्ययावत वार्ता या सर्वांचा देखील समावेश असणार आहे. यापूर्वीही, गुगल मॅपवर नवे फिचर सुरु केले असून त्यानुसार आता लॉकडाऊन काळात जेवण आणि राहण्याची सोय असलेली केंद्र दिसणार आहेत. गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य सध्या देशातील ३० शहरांमध्ये काम करणार आहे. हे वैशिष्ट्य, गुगल मॅपच्या सर्च आणि असिस्टंटच्या मदतीने लोकांना मदत केंद्रात पोहोचण्यास मदत करणार आहे. अन्न, निवारा किंवा रात्री निवारा शोधण्यासाठी वापरकर्ते टाइप करून किंवा बोलून गुगलला आदेश देऊ शकतात.  

टॅग्स :googleगुगलcorona virusकोरोना वायरस बातम्या