शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:11 IST

Coronavirus : जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू आहेत. इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सध्या रिचार्जची दुकानं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. जिओ युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लाँच केलं आहे. याच्या मदतीने युजर्सना घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवता येते. त्यानंतर आता ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना रिचार्ज करण्याची अडचण होऊ नये म्हणून जिओने 'ATM Recharge' सेवा सुरू केली आहे. रिचार्ज करताना कोणत्याही ओटीपीची गरज लागणार नसल्याचीही माहिती मिळत आहे. जिओने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.  State Bank of India, Axis Bank, ICICI Bank, HDFC Bank, IDBI Bank, Citibank, DCB Bank, AUF Bank आणि Standard Chartered Bank या बँकांच्या एटीएममध्ये जिओ युजर्सना रिचार्ज करता येणार आहे.

ATM मधून रिचार्ज करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

- सर्वप्रथम आपलं कार्ट एटीएम मशीनमध्ये टाका. त्यानंतर मेन्यूमध्ये  देण्यात आलेल्या रिचार्ज पर्यायावर टॅप करा

- ज्याला रिचार्ज करायचे आहे तो जिओ मोबाईल नंबर टाका. नंबर डायल केल्यानंतर 'OK/Enter' बटन दाबा.

- ATM PIN टाकावा लागेल. नंतर किती रुपयांचा रिचार्ज करायचा आहे. तेवढी रक्कम टाका.

- जिओच्या प्लॅनची आधीच माहिती घेऊन योग्य प्लॅन निवडून ठेवा आणि त्यानुसार रिचार्ज करा.

- ATM मशीनच्या स्क्रीवर तुम्हाला रिचार्जचा मेसेज दिसेल. तसेच अकाऊंटमधून रिचार्जचे पैसे कमी होतील. त्यानंतर जिओ मोबाईल नंबरवर रिचार्ज झाल्याचा मेसेज येईल. 

Coronavirus : रिलायन्स MyJio ने आणलं नवं टूल, आता घरबसल्या ओळखा कोरोनाची लक्षणं

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र आता घरबसल्या कोरोनाची लक्षण समजण्यास मदत होणार आहे. रिलायन्सच्या MyJio अ‍ॅपने एक नवीन टूल आणलं आहे. MyJio Coronavirus Tool असं या टूलचं नाव असून ते युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज़ लिमिटेडने #CoronaHaaregaIndiaJeetega ही एक मोहीम सुरू केली आहे. याच्या माध्यमातून रिलायन्स जिओने MyJio App मध्ये अनेक नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत. रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लाँच केले आहे. याच्या मदतीने युजर्सना घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवता येणार आहे. MyJio अ‍ॅपसह Jio.comया वेबसाईटवरूनही हे टूल वापरता येणार आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJioजिओRelianceरिलायन्सbankबँकatmएटीएमtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल