शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं 

By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 4:09 PM

iPhone Photography Awards: सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात.

iPhone च्या कॅमेरा कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक आयफोन युजर्स सतत करत असतात. अनेकजण iPhone चा वापर करून सुंदर सुंदर फोटोज देखील काढतात. अशा लोकांसाठी सुवर्ण संधी आली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात. या अवार्ड्सच्या विजेत्यांना सोनं आणि अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत.  

IPPA अवार्ड्समध्ये आयफोन किंवा आयपॅड युजर्स सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी तुम्ही 31 मार्च, 2022 पर्यंत तुमचे फोटोज सबमिट करू शकता. यात सहभागी होण्यासाठी 5.50$ (410 रुपये) एंट्री फी भरावी लागेल. तुम्ही कितीही फोटो सबमिट करू शकता आणि जिंकण्याची संधी वाढवू शकता. स्पर्धेत अ‍ॅब्सट्रॅक्ट, अ‍ॅनिमल्स, आर्किटेक्चर, चिल्ड्रन, सिटीस्केप, लँडस्केप, लाईफस्टाईल, नेचर, पीपल, पोर्ट्रेट, सीरीज (3 इमेज), स्टिल लाईफ, सनसेट, ट्रॅव्हल अशा 18 कॅटेगरीजचा समावेश आहे.  

स्पर्धेतील बक्षिसं   

18 कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला एक Gold Bar मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला प्लॅटिनम बार मिळेल. तर संपूर्ण स्पर्धेच्या विजेत्याला एक iPad Air मिळेल आणि टॉप 3 विजेत्यांना Apple Watch Series 3 देण्यात येईल. 

स्पर्धेचे नियम 

  • यात जगभरातील लोक सहभागी होऊ शकतात.  
  • हे फोटोज आधी कुठेही पब्लिश झालेले नसावेत, खाजगी सोशल मीडियावर पब्लिश झालेले फोटोज सबमिट करता येतील.  
  • फोटोशॉप किंवा इतर डेस्कटॉप इमेज प्रोसेसिंग प्रोग्राम करून बदल केलेले फोटो वापरता येणार नाहीत. परंतु IOS अ‍ॅपचा वापर करता येईल.  
  • iPhone अ‍ॅड-ऑन लेन्सचा वापर केला जाऊ शकतो.  
  • काही इमेजेस आयफोन, आयपॅड किंवा आयपॉडने कॅप्चर केल्या आहेत कि नाही याची शहानिशा केली जाऊ शकते.  

हे देखील वाचा:

धक्का! विवोच्या या फोनने आयफोन 13 च्या कॅमेऱ्याला पछाडले; किंमतही कमी...

आजूबाजूच्या आवाजच भान ठेवत म्युजिक ऐकण्यासाठी OnePlus Buds Z2 मध्ये खास मोड; किंमतीही बजेटमध्ये

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान