चिनी नागरिकाच्या स्टेमसेल्स भारतीय मुलाच्या शरीरात
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:42+5:302015-07-12T23:56:42+5:30
बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चिनी नागरिकाच्या स्टेमसेल्स भारतीय मुलाच्या शरीरात
ब जिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवी दिल्लीतील एका रुग्णालयात शनिवारी ही शस्त्रक्रिया झाली असून, चीनमधून या स्टेमसेल्स आल्यानंतर काही वेळात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय तज्ज्ञ विमर्श रैना यांनी ही शस्त्रक्रिया केली असून, भारतीय युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. चिनी रेडिओवर ही बातमी देण्यात आली. स्टेमसेल्स दाता असणारा चिनी नागरिक ३७ वर्षांचा असून, मॅरो डोनर कार्यक्रमात तो २०१२ पासून कार्यरत आहे. आपल्यामुळे परदेशी व्यक्तीचे प्राण वाचतील, अशी कल्पनाही कधी मी केली नव्हती, असे त्याने सांगितले. अनपेक्षितपणे माझा बोनमॅरो, परदेशी व्यक्तीशी जुळला. मला १२ वर्षांचा मुलगा असल्याने, भारतीय मुलाच्या वडिलांच्या भावना काय असतील हे माझ्या लक्षात आले. मला फक्त मदत करायची होती, असे त्याने सांगितले. नाते नसणार्या दोन व्यक्तींच्या स्टेमसेल्स जुळण्याची संधी अगदी कमी असते. दहा हजारांत एखाद्याच्या स्टेमसेल्स जुळू शकतात. भारतात स्टेमसेल्सची जपणूक योग्यरीत्या केली जात नाही. त्यामुळे आम्ही परदेशी डोनरचा शोध घेत होतो. चीनमध्ये आम्हाला हवा तसा डोनर मिळाला, असे डॉ. रैना यांनी सांगितले.